पैठण (औरंगाबाद) - लसीकरणाबाबत शासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. आज ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे २०० लसींचा साठा उपलब्ध झाला. मागील आठवड्यात एकदाच १५० लसींचा साठा उपलब्ध झाला होता. अशात आज नागरिकांनी अचानक लसीकरणासाठी रुग्णालय परिसरात गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
हेही वाचा - औरंगाबादमधील ऑक्सिजन प्लांटचे काम संथगतीने, भाजपाकडून आंदोलनाचा इशारा
ग्रामीण रुग्णालय बिडकीन हे ५८ खेड्यांचे मुख्य केंद्र आहे. याच लसीकरण केंद्रावर लस साठा उपलब्ध आहे. अशात आज लस कमी आणि लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी बघता बिडकीन येथे लस साठा योग्य पद्धतीने झाला तर लसीकरण व्यवस्थित पार पडेल, अन्यथा गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, रुग्णालयात जास्तीचा लस साठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा - 'सेवांकुर'च्या माध्यमातून भावी डॉक्टरांची लसीकरणासंदर्भात जनजागृती