ETV Bharat / state

जालन्याला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य पाईपलाइन आहे. पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील आठवड्यात बीड मार्गावर अशाच पद्धतीने पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. ती घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने पुन्हा लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

औरंगाबाद जायकवाडी धरण न्यूज
औरंगाबाद जायकवाडी धरण न्यूज
author img

By

Published : Oct 28, 2020, 5:21 PM IST

औरंगाबाद - जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन पैठण-पाचोड रस्त्यावरील आखतवाडा फाट्याशेजारील चारी नंबर दोनच्या जवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे फवारे सर्वत्र उडत असल्याचे पाहायला मिळाले. पाण्याचा जोर इतका मोठा होता की, जवळपास चाळीस फूट उंच फवारा उडत होता.

हेही वाचा - लातूरकरांची चिंता मिटली; मांजरा धरण 100 टक्के भरले

जायकवाडी धरणातून जालना शहराला पाणीपुरवठा करणारी ही मुख्य पाइपलाइन आहे. पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील आठवड्यात बीड मार्गावर अशाच पद्धतीने पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले होते. ती घटना ताजी असतानाच जालना जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्याने पुन्हा लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

फुटलेली पाईप लाइन
पैठण-औरंगाबाद महामार्गावर पाइपलाइन फुटण्याच्या घटना नेहमीच घडतात. पाइपलाइन जुनी झाल्याने नव्याने पाण्यासाठी योजना राबवणे गरजेचे आहे. मात्र, राजकीय वादात योजनांची घोषणा होते. मात्र पाइपलाइन दुरुस्ती पूर्ण होत नाही. त्यात पाणी चोरी करण्यासाठी अनेक ठिकाणी पाइपलाइन फोडण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे पाइपलाइन फुटून पाणी वाया गेल्याच्या घटना घडतात. त्यात आज सकाळी पैठण-पाचोड रस्त्यावरील आखतवाडा फाट्याशेजारील चारी नंबर दोनच्या जवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे उंच फवारे उडाले. जालना विभागातून पाइप दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले.

हेही वाचा - दहा दिवसात दोन लाख मुंबईकरांनी केला मेट्रो प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.