ETV Bharat / state

Adhik Maas 2023: 'अधिक मास आणि श्रावण' हे दोन्ही वेगवेगळे महिने, अध्यात्मिक महत्त्व देखील वेगळे- सुरेश जोशी गुरुजी - पुरूषोत्तम मास

अधिक मास हा 'पुरुषोत्तम' मास म्हणून ओळखला जातो. यंदा श्रावण आणि अधिक मास एकत्र आले आहेत. त्यांचे अध्यात्मिक महत्त्व काय आहे, ते जाणून घेवू या.

Adhik Maas 2023
अधिक मासाचे महत्त्व
author img

By

Published : Jul 25, 2023, 10:52 AM IST

Updated : Jul 25, 2023, 12:30 PM IST

छत्रपती संभाजीनगर : अधिक मास असल्याने श्रावण महिण्याबाबत अनेक संभ्रम सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाले आहेत. दोन महिन्याच्या काळात नेमकी पूजा कशी असावी, उपवास कसे करावे? याबाबत मत-मतांतरे पाहायला मिळतात. मात्र दोन्ही महिने वेगवेगळे आहेत. त्यातील धार्मिक पूजा परंपरा वेगवेगळ्या आहेत, याबाबत कुठलाही संभ्रम ठेवण्याची गरज नसल्याचे मत अध्यात्मिक अभ्यासक सुरेश जोशी गुरुजी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले आहे.

'म्हणून' येतो अधिकमास : दर तीन वर्षांनी अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना येत असतो. त्याला अध्यात्मिक कारणासोबतच वैज्ञानिक कारण देखील असल्याची माहिती अध्यात्मिक अभ्यासक सुरेश जोशी गुरुजी यांनी दिली. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याचे पूर्ण पर्व 355 दिवसात पूर्ण होते. आपण मान्य करत असलेले वर्ष 365 दिवसांचे असते. दरवर्षी दहा दिवसांची तूट या फेऱ्यांमध्ये येत असते. त्यामुळे दर तीन वर्षांनी असलेली ही तूट अधिक मास पूर्ण करतो. हा विशेष महिना म्हणून आपण साजरा करतो, या काळात चंद्राची परिक्रमा दोनदा मोजली जाते. या महिन्यात दानधर्म करण्याची प्रथा आहे. यामध्ये गोरगरिबांना, अध्यात्मिक कार्य करणाऱ्यांना दान दिले जाते. तसेच घरच्या जावयाला देखील भेटवस्तू देऊन पुण्य कमावले जाते, अशी माहिती सुरेश जोशी गुरुजी यांनी दिली.

विष्णु देवतेची उपासना : दर तीन वर्षांनी अधिक मास येत असतो. हा महिना देखील श्रावण महिन्याप्रमाणेच पवित्र मानला जातो. दोन्ही महिन्यांचे मिळून आठ सोमवार पवित्र मानले जात आहेत. मात्र अधिक मास काळात उपवास करणे बंधनकारक नाही. अनेकजण या काळात उपवास करत नाही, किंवा पूजा अर्चा करत नाहीत. तर काहीजण फक्त पूर्ण महिन्यात सोमवारी उपवास करत असतात. मात्र याचा आणि श्रावण महिन्याचा कुठेही संबंध येत नाही. श्रावण महिना हा पूर्णतः वेगळा असून तो अधिक मास महिन्याच्या अमावस्येनंतर चालू होतो. अधिक मास हा विष्णू देवाचा महिना असतो, त्यामुळे विष्णु देवतेची उपासना या महिन्यात अधिकाधिक केली जाते, अशी माहिती सुरेश जोशी गुरुजी यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Adhik Maas 2023: पवित्र अधिक मास होतोय आजपासुन सुरू, चुकूनही करू नका 'हे' काम
  2. Shravana Mass 2023 : अधिक श्रावण मास कसा असेल आणि त्यात काय करावे ? आता सर्व शंका होणार दूर...
  3. Adhik Maas 2023 : श्रावणात अधिक मास; या महिन्यात सर्व प्रकारचे शुभ विवाह वर्ज्य, जाणून घ्या कारण

Last Updated : Jul 25, 2023, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.