औरंगाबाद - अनिल देशमुख यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तुरूंगात टाकलं. गृह मंत्री महाराष्ट्राचा वसुली करतोय त्यामुळे तुमची मान खाली गेली पाहिजे. मात्र हे धमकी देत आहेत. ही धमकी ईडी अधिकारी, न्यालायतील न्यायाधीश आणि भाजपाला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी औरंगाबादेत केला.
अर्जुन खोतकर यांनी घेतला नियमबाह्य कारखाना -
अर्जुन खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या व्यवहाराबाबतची तक्रार ईडीसह सर्व खात्यांकडे देणार आहे. जालना सहकारी साखर कारखाना चुकीच्या पद्धतीने हडप केला. टेंडर काढताना अर्जुन खोतकर यांनीच वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून भरले आणि कारखाना घेतला. हे षड्यंत्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे चेलेच करू शकतात, असा देखील आरोप सोमय्या यांनी केला. औरंगाबादमुळे आणि तापडिया यांच्या माध्यमातून हा कारखाना विकत घेतला. अर्जुन खोतकर राज्य सरकारची जमीन लुटण्याचा काम करत आहे. कामगारांचे पैसे त्यांनी दिले नाहीत, मात्र त्या जमिनीवर कारखाना नाही. इमारत उभी केली जात आहे, खोतकर यांनी एक हजार शेतकऱ्यांची जमीन लाटली आहे. त्याबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी लवकरच कारवाई सुरू होणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशमुखांची नाही, पुतण्याची चिंता -
आजवर केलेल्या आरोपांवर ते चर्चा करत नाहीत, त्यावर बोलत नाही. मला धमक्या आल्या, मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र ठाकरे सरकारने सुरक्षा दिली नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेड प्लस सुरक्षा दिली. लॉकडाऊन मध्ये मुख्यमंत्र्यांच्या मित्राने कोविड रुग्णालयाच्या नावाने लिजवर घेऊन नंतर विकत घेतल्याचे दाखवले, असा आरोप सोमय्या यांनी केला. तर अजित पवार यांनी बिल्डरकडून शंभर कोटी घेतले. त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने ट्रान्स्फर केले आणि परत केले नाही. शरद पवार यांना अनिल देशमुख नाही तर अजित पवार यांची चिंता आहे. अजित पवार यांची बेनामी सत्ता जप्त केली, असाही आरोप सोमय्या यांनी केला.