ETV Bharat / state

कौतुकास्पद ! रुग्णांना मोफत जेवण देणारा 'अन्नदाता'; 'त्या' घटनेमुळे केली सुरुवात

औरंगाबादेतील हेडगेवार रुग्णालयात तब्बल ८०० रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. गेल्या ८ वर्षांपासून याच रुग्णालयातील सेवानिवृत्त खिवंसरे काका रुग्णांची भूक भागवतात. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णालय देखील काकांच्या कार्याला सलामी ठोकतात.

खिवंसरे काका रुग्णांना मोफत जेवणे देताना
author img

By

Published : Sep 2, 2019, 10:46 AM IST

Updated : Sep 2, 2019, 3:14 PM IST

औरंगाबाद - हेडगेवार रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी बरेचसे रुग्ण बाहेरून उपचारासाठी दाखल होतात. त्यावेळी जवळच कोणी नसल्याने रुग्णाला आणि नातेवाईकांना जेवणासाठी खाणावळ किंवा हॉटेल शोधव लागते. मात्र, अशा रुग्णांसाठी गेल्या ८ वर्षांपासून खिवंसरा काका मोफत जेवण देतात. त्यामुळे या रुग्णांना त्यांचा खूप फायदा होतो.

औरंगाबादेतील हेडगेवार रुग्णालयात रुग्णांना मोफत जेवण,बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

राजकुमार खिवंसरा काही वर्षांपूर्वी हेडगेवार रुग्णालयातील रक्तपेढीत काम करत होते. त्यावेळी एका रुग्णाला जेवण मिळाले नसल्याने ते उपाशी असल्याचे त्यांना दिसून आले. काकांनी दुसऱ्या दिवशीपासून त्या रुग्णासाठी घरून मोफत डबा आणून दिला. त्यांच्या डब्यामुळे त्या रुग्णाला मोठा दिलासा मिळाला. त्यावेळी त्यांनी अनुभवले की अनेक रुग्णांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यादिवशी त्यांनी होईल तितक्या लोकांच्या मोफत जेवणाची सोय केली. त्यांचे हे काम पाहून अनेक मदतीचे हात त्यांना जोडले गेले. दानशूर व्यक्तींच्या मदतीने काका रोज तीन वेळा 800 लोकांना मोफत जेवणाचे वाटप करतात. ही मदत हळूहळू वाढत असल्याचे खिवंसरा काका सांगतात.

हेडगेवार रुग्णालयाला काकांचे कौतुक -
काकांच्या मदतीला रुग्णालयातील सेवावृत्ती देणाऱ्या व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. काका देत असलेले जेवण हे उत्तम प्रतीचे साजूक तुपातले असते. आपण घरी देखील खाणार नाही इतके चांगले जेवण काका देतात. त्यांच्या या कार्याने रुग्णांना मोठी मदत होते. त्यामुळे त्यांचे कार्य पुन्हा वाढावे, अशी मनोकामना डॉ. अनंत पंढेरे यांनी व्यक्त केली. तसेच खिवंसरा काका हेडगेवार रुग्णालयाचे भूषण असल्याचे ते म्हणाले.

सेवानिवृत्त झाल्यानंतरही रुग्णांप्रती आपुलकी -
काही वर्षांपूर्वी खिवंसरा काका हेडगेवार रुग्णालयातून सेवानिवृत्त झाले. मात्र, रुग्णांविषयी त्यांना वाटणारी आपुलकी आणि काळजी आजही तशीच आहे. त्यामुळे रुग्णांना मोफत जेवण देण्याचा वसा खिवंसरा काका नावाने प्रचलित असणाऱ्या या वृद्ध माणसाने उचलला आहे. त्यामधून दररोज 700 ते 800 रुग्णांची भूक भागत असते. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक काकांच्या या उपक्रमाचे कौतुक करतात. काकांकडून जेवण मिळाले नसते, तरी आमच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली असती, असे रुग्ण सांगतात.

Intro:(pl make special pkg)
एखाद्या कुटुंबातील व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली की अनेक अडचणी येतातच. त्यात रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला जेवणाची अडचण होऊ नये यासाठी जर कोणी मोफत जेवण देत असेल तर साक्षात देवच धावून आल्याचा अनुभव येतो. असाच अनुभव औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात गेली सहा वर्षांपासून रुग्णांना येतो.

रुग्णांना मिळतो दिलासा..
औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील बरेचसे रुग्ण बाहेर गावावरून उपचारासाठी दाखल होतात. त्यावेळी जवळच कोणी नसल्याने रुग्णाला आणि नातेवाईकांना जेवणासाठी खानावळ किंवा हॉटेल शोधव लागते. उपचार घेत असताना अनेकांकडे पुरेसे पैसे देखील नसतात. अश्या रुग्णांना खिवंसरा काकाच्या या कार्याचा फायदा होतो. त्यामुळे काकांच्या या उपक्रमाच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक कौतुक करतात. त्यांच्या कडून जेवण मिळाल नसत तर काही वेळा उपाशी रहावं लागलं असत अशी प्रतिक्रिया रुग्ण देतात.

हेडगेवार रुग्णालयाला काकांच कौतुक
खिवंसरा काका हेडगेवार रुग्णालयाचे भूषण असल्याचं मत रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनंत पंढेरे यांनी व्यक्त केलं. काकांच्या मदतीला रुग्णालयातील सेववृत्ती देणारी व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. काका देत असलेलं जेवण हे उत्तम प्रतीचे साजूक तुपातले असते. आपण खरी देखील खाणार नाही इतकं चांगलं जेवण काका देतात. त्यांच्या या कार्याने रुग्णांना मोठी मदत होते त्यामुळे त्यांच कार्य अजून वाढावं अशी मनोकामना डॉ अनंत पंढेरे यांनी व्यक्त केली.

Body:औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात खिवंसरा काका नावाचा देवदूत रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन देत आहे. एका रुग्णाला मदत काकांनी सुरू केली होती. त्यांची मदत पाहून अनेक मदतीचे हात काकांशी जोडले गेले आज आठ वर्षात ही सेवा 800 लोकांपर्यंत येऊन पोहचली आहे.

Conclusion:हेडगेवार रुग्णालयात दिवसातून तीन वेळा एक आवाज गेल्या आठ वर्षांपासून येतो. चला जेवण आलाय, ज्याला हवं असेल त्याने मोफत जेवण घ्या असे शब्द कानावर पडतात. हा आवाज असतो राजकुमार खिवंसरा या काकांचा. खिवंसरा काका नावाने प्रचलित असणाऱ्या या वृद्ध काकाने आगळंवेगळं वसा स्वीकारला आहे. काका रोज 700 ते 800 लोकांना मोफत जेवण खाऊ घालतात. खिवंसरा काका काही वर्षांपूर्वी हेडगेवार रुग्णालयात रक्तपेढीत काम करत होते. ते सेवानिवृत्त झालेत. मात्र रुग्णांविषयी त्यांना वाटणारी आपुलकी आणि काळजी आजही तशीच आहे. आठ वर्षांपूर्वी एका रुग्णाला जेवण मिळालं नसल्याने ते उपाशी असल्याचं त्यांना दिसून आलं. दुसऱ्या दिवशीपासून त्या रुग्णासाठी काकांनी घरून मोफत डबा त्यांना दिला. त्यांच्या डब्यामुळे त्या रुग्णाला मोठा दिलासा मिळाला. त्यावेळी त्यांनी अनुभवलं की अनेक रुग्ण याच त्रासाला समोर जावं लागतं. त्यादिवशी त्यांनी होईल तितक्या लोकांच्या मोफत जेवणाची सोय केली. त्याच हे काम पाहून अनेक मदतीचे हात त्यांना जोडले गेले. दानशूर व्यक्तींच्या मदतीने काका आज रोज तीन वेळा 800 लोकांना मोफत जेवण वाटप केले जात आहे. ही मदत हळूहळू वाढत असल्याच खिवंसरा काका सांगतात.
Last Updated : Sep 2, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.