ETV Bharat / state

गीता माझीच मुलगी, जिंतूरच्या महिलेचा दावा - pakistan return geeta news

जिंतूरच्या मीना पांढरे या महिलेने गीता आपलीच मुलगी असल्याचा दावा केला आहे. मीना यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार गीता तिच्या कुटुंबासोबत जिंतूर येथे राहत होती. त्या ठिकाणी मंदिराची पूजाअर्चा करण्याचे काम त्या करत होत्या. गीता जेव्हा 4 वर्षाची होती. तेव्हा तिला काही कारणास्तव रागावले होते. त्यावेळी ती रडत रडत मंदिरातून निघून गेली. मात्र ती परत आलीच नाही.

geeta_motJintur woman claims that deaf-mute geeta is her daughterher
गीता माझीच मुलगी, जिंतूरच्या महिलेचा दावा
author img

By

Published : Jan 9, 2021, 2:04 AM IST

औरंगाबाद - पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताच्या कुटुंबीयांचा शोध सुरू असतानाच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असलेल्या जिंतूर येथील एका कुटुंबाने गीता माझीच मुलगी आहे, असा दावा केला आहे. गीताच्या शरीरावर असलेल्या काही खुणा या महिलेने सांगितल्या असून त्या गीताच्या शरीरावर असलेल्या खुणांसोबत मिळत्याजुळत्या आहेत. मात्र, असे असले तरी डीएनए चाचणी नंतरच योग्य निर्णय घेतला जाणार आहे.

गीता माझीच मुलगी, जिंतूरच्या महिलेचा दावा

गीताचा फोटो नसल्याने दिली नाही पोलीस तक्रार...

जिंतूरच्या मीना पांढरे या महिलेने गीता आपलीच मुलगी असल्याचा दावा केला आहे. मीना यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार गीता तिच्या कुटुंबासोबत जिंतूर येथे राहत होती. त्या ठिकाणी मंदिराची पूजाअर्चा करण्याचे काम त्या करत होत्या. गीता जेव्हा 4 वर्षाची होती. तेव्हा तिला काही कारणास्तव रागावले होते. त्यावेळी ती रडत रडत मंदिरातून निघून गेली. मात्र ती परत आलीच नाही. त्यावेळी पोलिसांकडे जाण्याची भीती वाटत होती. त्याचबरोबर गीताचा फोटोही नसल्याने तक्रार देता आली नाही. मात्र ती परत येईल असा विश्वास होता. आज गीताला भेटता आल्याने आनंदी असल्याचे मीना पांढरे यांनी सांगितले.

Jintur woman claims that deaf-mute geeta is her daughter
पांढरे कुटुंबीय

गीताच्या शरीरावर जळलेली खूण असल्याने दावा..

गीता माझीच मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या मीना पांढरे या जिंतूरला राहत होत्या. त्यांचे पती सुधाकर वाघमारे यांचे निधन झाल्यावर त्यांनी दिनकर पांढरे यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्या औरंगाबादच्या वाळूज परिसरात राहण्यासाठी आल्या. गीता हरवल्यानंतर तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. माझ्या मुलीच्या शरीरावर जळलेली खूण आहे, तशीच खून गीताच्याही शरीरावर आहे. त्यामुळे ती माझी मुलगी आहे, असे मीना पांढरे यांनी सांगितले.

आईसह कुटुंबीयांचा गीतावर दावा....

मीना पांढरे आणि त्यांच्या दोन मुलींसह त्या जिंतूर येथील मंदिरात सेवा करत होत्या. गीताची मोठी बहीण मंदिराच्या बाहेर फुेले विकण्याचे काम करायची. त्यावेळी गीता देखील त्यांच्यासोबत मंदिर परिसरातच असायची, असा अनुभव मीना पांढरे यांनी सांगितला. गीताजी मोठी बहीण वासंती वाघमारे विवाहानंतर गंगाखेडच्या चिंतामणी मंदिरात राहतात. त्यांचे पती मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनीदेखील गीता माझीच बहीण असल्याची माहिती दिली. शोधमोहीम करणाऱ्या पथकासोबत मीना आणि वसंती या गीताला भेटल्या होत्या. त्यावेळेस बराच वेळ त्यांनी गीतासोबत घालवला. गीतासोबत त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला होता. त्यावेळी गीताला भेटून, तिच्यासोबत बोलून वेगळाच आनंद झाला होता. आपली गीता आपल्याला मिळाली अशी भावना निर्माण झाली ,अशी माहिती मीना पांढरे यांनी दिली.

अशी झाली मीना आणि गीताची भेट...

गीता चुकून रेल्वेत बसली होती आणि लाहोरला पोहोचली. मूकबधिर असलेली गीता तब्बल 15 वर्षे पाकिस्तानात राहिली. 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून गीता पुन्हा भारतात आली. इंदूरच्या आनंद आणि मोनिका पुरोहित यांच्या आनंद सर्विस सोसायटीत ती सध्या राहत आहे. मूकबधिर असल्याने तिने सांगितलेल्या खानाखुना यांच्या आधारावर काही चित्र रेखाटण्यात आले होते. त्या चित्रांच्या आधारावर गीताच्या कुटुंबीयांचा शोध हा सुरू करण्यात आला होता. देशात विविध ठिकाणी काही संदर्भ जोडले जातात का? याबाबत देखील विचारणा केली. मात्र मराठवाडा आणि तेलंगण सीमेवर असे काही संकेत असल्याने, गीताला या आधी दोनदा मराठवाड्यात आणण्यात आले होते. औरंगाबाद - लासुर अशा काही परिसरात गीताला नेण्यात आले होते. मात्र जिंतूरमध्ये असलेली काही स्थळे गीताला परिचित वाटत असल्याने जिंतूर येथे शोध घेण्यात आला होता. त्यावेळेस मीना पांढरे यांना औरंगाबादला निरोप पाठवून बोलावून गीताची ओळख पटण्यास सांगितले होते. त्यानुसार मीना पांढरे यांनी गीताच माझी मुलगी असल्याचा दावा केला होता.

डीएनए चाचणीनंतर होणार निर्णय...

मीना पांढरे आणि त्यांची मुलगी वासंती वाघमारे यांनी गीता आमच्या कुटुंबातील एक भाग असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार आता गीताची ओळख पटवण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे. कुटुंबीयांचे आणि गीताचे डीएनए तपासली केली जाणार असून, त्यानंतरच गीताला कुटुंबाला सोपवायचे का नाही त्याबाबत निर्णय होणार आहे.

हेही वाचा - ट्रम्प यांनी 'रिपब्लिकन' नावाचा अवमान केला, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा करेन - आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.