औरंगाबाद - दोन दिवसांपूर्वी रिक्षामध्ये मृतावस्थेत आढळलेल्या त्या मुलीची ओळख अखेर पटली आहे. मंगल संजू उबाळे अस मुळीच नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी असल्याच पोलीस तपासात समोर आले आहे.
मुलीला मृतावस्थेत सोडणारी निघाली बहीण -
शुक्रवारी संध्याकाळी चिकलठाणा परिसरात एका रिक्षामध्ये मृत मुलीला सोडून दोन जणांनी पळ काढण्याचे समोर आले होते. मुलीच्या आई वडिलांनी सोडल्याच बोलल जात होते. मात्र, मृत अवस्थेत सोडून पळ काढणारे तिचे आई-वडील नसून मोठी बहीण आणि भाऊजी असल्याचे समोर आला आहे. पोलिसांनी तपास केला असता मृत मुलगी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यतील असल्याच निष्पन्न झाले. मुलीचे आई वडील औरंगाबादला आले असता त्यांनी मुलीची ओळख पटवली आहे.
मंगलला सोडून बहीण आणि भाऊजी पसार-
शवविच्छेदन अहवालानुसार, ती आजारी असल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मांडे यांच्या पथकाने रिक्षा चालकाच्या मदतीने मुलीची ओळख पटवण्याचे काम सुरू केले होते. मंगल, तिची मोठी बहीण पूजा गवळी आणि भाऊजी दीपक गवळी सोबत 20 जानेवारीपासून अचानक घरातून निघून गेली होती. तेव्हापासून तिघेही संपर्कात आले नाहीत, त्यामुळे 20 जानेवारीला मेहकर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीला मृतावस्थेत सोडून गेलेले बहीण आणि भाऊजी मात्र अद्याप सापडले नसून त्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.