ETV Bharat / state

ISRO Scientist Fatally Attacked : लग्नाच्या एकदिवस आधी इस्रोच्या वैज्ञानिकावर जीवघेणा हल्ला, परभणीत धक्कादायक घटना - जिवघेणा हल्ला

स्वत:च्या हळदीला परभणीत येत असलेल्या व वैज्ञानिक असलेल्या पंकज प्रकाश कदमवर जिवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scientist Fatally Attacked
नवरदेवाला मारहाण
author img

By

Published : May 10, 2023, 7:57 PM IST

छत्रपती संभाजीनगर: स्वत:च्या लग्नासाठी येत असताना नवरदेवावर हल्ला करण्यात आला आहे. लग्न जुळले, तारीख ठरली, पाहता पाहता वऱ्हाड लग्नासाठी मुलीच्या गावात दाखल झाले. मात्र लग्नाच्या एक दिवस आधी अज्ञात आरोपीने शास्त्रज्ञ असलेल्या नवरदेवाला रस्त्यात अडवत बेदम मारहाण केली. यात त्याला गंभीर दुखापत झाली. मंडपात जाण्याऐवजी वर रुग्णालयात पोहचला. ही धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली. या घटनेत संशयितांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुलगा आहे वैज्ञानिक: श्रीहरी कोटा येथील इस्रो संस्थेत काम करत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पंकज कदम या वैज्ञाकीचा विवाह परभणी येथील युवतीशी ठरला. विवाह 9 मे रोजी करण्याचे ठरले होते. हळद आणि नंतर लग्न असा समारंभ घेण्याचे नक्की करण्यात आले. त्यासाठी नवरदेव आपल्या नातेवाइकांसह परभणी येथे येत असताना रस्त्यात त्याच्या वाहनावर तीन दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी हल्ला केला. परभणी वसमत रस्त्यावर हा हल्ला झाला. यात पंकज कदम याला गंभीर दुखापत झाली. लग्न मंडपात जाणारा नवरदेव रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत पोहचला.

पोलिसांनी केला तपास सुरू: लग्नाच्या दोन दिवस आधी हळदीसाठी येणाऱ्या शास्त्रज्ञावर जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. परभणी गुन्हे शाखेच्या पोलिसांचे दोन पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पूर्णा पोलिसांनी दिली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ असलेल्या पंकज कदम यांचा विवाह ठरलेल्या मुलीचे एका मुलाशी प्रेम आहे. तिला हा विवाह मान्य नाही, त्यामुळे लग्न मोडण्यासाठी तिच्या सांगण्यावरून प्रियकराने हा हल्ला घडवला असावा असा संशय व्यक्त केला जातो. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. father threw two children नशेच्या आहारी गेलेल्या बापाने दोन मुलांना ढकलले विहिरीत एक बचावला दुसऱ्याचा मृत्यू
  2. Chhatrapati Sambhaji Nagar Crime टोळक्याकडून तरुणीची भर रस्त्यात छेडछाड तरुणीला त्रास देताना व्हिडिओ व्हायरल
  3. Anti Encroachment Action अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या विरोधात दुकानदाराने जाळले साहित्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.