ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या - ईशा राजेश तंगडपल्ली आत्महत्या

औरंगाबादमध्ये सराफा बाजारातील मोहन थिएटरमागे एका युवतीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ईशा राजेश तंगडपल्ली असे त्या तरुणीचे नाव आहे. ईशा तंगडपल्ली सरस्वती भवन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडिल सलून दुकानात काम करतात, तर आई कपड्यांच्या दुकानात कामाला जाते.

Aurangabad
Aurangabad
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:26 PM IST

औरंगाबाद - महाविद्यालय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (27 जून) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना सराफा बाजारातील मोहन थिएटरमागे घडली. ईशा राजेश तंगडपल्ली (18 वर्षे, रा. विठ्ठल मेहंदी दुकानाशेजारी) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.

ईशा होती सरस्वती भवन महाविद्यालयाची विद्यार्थीन

ईशा तंगडपल्ली ही सरस्वती भवन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. आज सकाळी तयारी करून मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर ती घरी परतली. वडिल सलून दुकानात कामाला गेले होते. तर आई कपड्याच्या दुकानात कामाला गेली होती.

साफसफाई करते सांगत ईशाने घेतला गळफास

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घराची साफसफाई करते, असे सांगत ईशाने आजीला घराबाहेर थांबण्यास सांगितले. तर काही वेळाने घरी आलेल्या धाकट्या भावाच्या ईशाने स्वयंपाक खोलीत गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना बोलावून ईशाला तत्काळ बेशुध्दावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिच्या अकस्मात मृत्यूची नोंद सिटी चौक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

यापूर्वीही एका तरुणीची आत्महत्या

दरम्यान, तरुणींच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच लातूर शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या सोनी शेख या १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी 'इंस्टाग्राम' या सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर तीने आत्महत्या केली होती.

हेही वाचा - इगतपुरीत हाय-प्रोफाइल 'रेव्ह पार्टी'वर छापा, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीसह 22 जणांवर कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.