औरंगाबाद - हायवा ट्रक चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख वीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून आणखीही मोठया प्रमाणात हायवा ट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ भेट दिली. यावेळी जीवन कराड यांच्याकडे विचारपूस केली असता सचिन सुभाष बडे, (वय ३० वर्ष, रा.हिवरशिंगा ता.शिरूर कासार जि. बीड), गणपत परमेश्वर जायभाय (वय ४५ वर्ष, रा. महाकाल अंकुशनगर कारखाना, ता.अंबड जि. जालना), ज्ञानेश्वर सर्जेराव दहीफळे (वय ३० वर्ष, रा. विठ्ठलवाडी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर), राजेंद्र शंकर देवकर (वय ४० वर्ष, रा. सर्वे नंबर १४, चारणवाडी, देवळाली कॅम्प नाशिक), (सोपान प्रभाकर मोरे, वय ३६ बर्ष, रा. उखळवाड़ी, पोरट जाटनांदर, ता. शिरुर कासार जि. बीड) राहूल श्रीमंत दुर्लेकर (वय २६ वर्ष, रा. नरोटेबाडी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर) यांना ट्रकसह ताब्यात घेतले आहे.
आरोपींच्या ताब्यातून तीन हायवा ट्रक, गुन्ह्यांत वापरलेल्या तीन कार, दोन मोटार सायकल, मोबाईल असा एकुण १ कोटी ३ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना चिकलठाणा पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले. आणखीही मोठया प्रमाणात हायवा ट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत फुदे, संदीप सोळके, गणेश राऊत सफी वसंत लटपटे, भालेराव, धिरज जाधव, विक्रम देशमुख, किरण गोरे, प्रमोद खांडेभराड, बालू पाथ्रीकर, नामदेव शिरसाठ, राजेंद्र जोशी, दिपेश नागारे, पोना शेख नदीम, संजय भोसले, राहुल पगारे, नरेंद्र खंदारे वाल्मीक निकम, पोकों गणेश गांगचे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संतोष डमाळे यांनी कारवाई केली आहे.
हेही वाचा - बुलडाण्यात चारचाकी-दुचाकीच्या जोरदार धडकेत पती-पत्नी ठार!