औरंगाबाद - फटाके फोडताना मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना हडको परिसरात समोर आली. शिवराज रमेश इधाटे अस मुलाचे नाव असून त्याचा डोळा नशिबाने बचावला आहे.
दिवाळी सणानिमित्त शिवराज फटाके उडवत होता. त्यावेळी काडेपेटीची काडी तुटून पेटलेले गुल डोळ्यात उडाले. त्यामुळे काळ्या बुबुळला जखम झाली, त्याला दिसणे बंद झाले. सणामुळे जवळ कोणते रुग्णालय सुरू नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली होती. त्यावेळी MGM रुग्णालयात उपचार होतीस अशी माहिती मिळताच कुटुंबीयांनी दवाखान्यात धाव घेतली. तातडीने इलाज सुरू केला. जवळपास 3 तास उपचार केल्यावर त्याची नजर वाचली. उशीर झाला असता तर कदाचित एका डोळ्यांनी दिसले नसते. अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.
नागरिकांनी काळजी घ्यावी -
फटाके फोडताना काळजी घ्या असे आवाहन नेहमी केलं जातं. मात्र, अनेक वेळा छोटीशी चूक जीवावर बेतते याच उदाहरण अनेक वेळा समोर आलं आहे. शिवराजचा डोळा वाचला असला तरी त्यात काही प्रमाणात त्रास कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी फटाके वाजवताना काळजी घ्यावी असे आवाहन शिवराजने केले आहे.