ETV Bharat / state

India vs Bharat Naming Issue: पाकिस्तान 'इंडिया' हे नाव घेऊ शकतो का? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत - इंडिया आणि भारत

India vs Bharat Naming Issue : सध्या इंडिया आणि भारत नावावरून वातावरण चांगलंच तापलंय. ईटीव्ही भारतने या विषयावर राजकीय विश्लेषक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांच्याशी संवाद साधलाय. त्याविषयी या रिपोर्टमधून सविस्तर जाणून घेवू या.

India vs Bharat Naming Issue
इंडिया आणि भारत नावावरून राजकीय वाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 8:37 PM IST

Updated : Sep 6, 2023, 8:48 PM IST

राजकीय विश्लेषक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) India vs Bharat Naming Issue : इंडिया आणि भारत नावावरून सध्या राजकीय वाद सुरू झालाय. मात्र, देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील असाच वाद निर्माण झाला होता. तेव्हा इंडिया नावासाठी मतदान घेण्यात आलं होतं, अन् नावावर शिक्कामोर्तब झालं. संविधानातील पहिलंच कलम दोन्ही नाव एकच असल्याचं सांगतंय. त्यावेळी फाळणीची मागणी करणारे मोहम्मद अली जिना यांनी हे नाव वापरू नका, असं मत व्यक्तव्य केलं होतं. आज जर देशाचं नाव 'भारत' करण्याचा प्रस्ताव घेऊन घटनेत दुरुस्ती केली, तर 'इंडिया' हे नाव पाकिस्तान घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत राजकीय विश्लेषक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलंय.

इंग्रजांनी दिलं होतं नाव : भारत आणि इंडिया (India vs Bharat) या दोन्ही नावांना जुना इतिहास आहे. पुराणांमध्ये भारत वर्ष म्हणून उल्लेख आहे. ऋग्वेदात दसराजन वारमध्ये भारत जातीय समाजाच्या राजाचा विजय झाला. तेव्हापासून या नावाचा उल्लेख होतोय. तर हिमालयाच्या खालच्या बाजूला किंवा सिंधू नदीच्या दक्षिणेला असलेला भाग 'इंडस' म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर इंग्रजांनी 17-18 व्या शतकाच्या दरम्यान देशाला इंडी किंवा इंडिया, इंडस अशी ओळख दिली. त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यावर संविधान तयार होत असताना या विषयावर चर्चा झालीय. त्यात संविधान सभेत एस. व्ही. कामत यांनी 'भारत' हे नाव कायम ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर अनेक मतमतांतरे समोर आली. इंडिया नाव ठेवावं का नाही, यावर मतदान झालं. त्यात 51 विरोधी 38 मतांनी नाव कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यात संविधानात कलम नंबर एकमध्ये भारत म्हणजेच इंडिया असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सरकारनं भारत हे नाव वापरलं, तर त्यात कुठलीही चूक नाही. जर संविधानामधूनच ठराव घेऊन नाव कायमस्वरूपी हटवलं, तर मात्र तो प्रश्न निर्माण होऊ शकतो असं मत राजकीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त (Political analyst Dr Satish Dhage Reaction) केलंय.

म्हणून ठेवलं 'इंडिया' नाव कायम : जगात भारत देशाला एक वेगळ महत्त्व प्राप्त आहे. जगात प्रत्येक क्षेत्रात 'इंडिया' हेच नाव वापरून जागतिक पातळीवर देशानं आपलं नाव उंचावलय. मात्र आज इंडिया आणि भारत या नावावरून राजकारण चांगलंच तापलंय. आता भारत हे नाव वापरण्याकडे केंद्र सरकारचा कल दिसून येतोय. मात्र संविधान तयार करत असताना देखील भारत नाव जगासमोर आणावं, असं वाटत असताना इंडिया हे नाव सुद्धा ठेवण्यात आलं. त्यामागे एक वेगळा विचार होता. इंग्रजांनी जगभरात देशाची इंडिया नावानं ओळख पुढे नेली. ही ओळख सहजासहजी पुसून भारत नावानं ओळख निर्माण करणं अवघड गेलं असतं. त्यात खूप मोठा काळ निघून गेला असता. त्यामुळंच संविधान सभेत भारतासोबत इंडिया या नावाला देखील मान्यता देण्यात आली होती. इंग्रजांनी दिलेलं हे नाव असलं, तरी हे पुढे वापरावं असं मंजूर करण्यात आलं होतं. मात्र आज देश अमृत काळापासून पुढं जातोय. त्यामुळे त्याची जुनी ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असं मत राजकीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त (India vs Bharat Naming Issue Political analyst) केलंय.

काँग्रेस खासदारांचा प्रस्ताव : केंद्र सरकारद्वारे इंडिया ऐवजी भारत नावाचा उल्लेख केला जातोय. यात चूक नसली तरी, वेळ मात्र चुकत असल्याचं दिसून येत आलंय. मागील 75 वर्षात भाजपाच्या एकाही खासदारांनी भारत नाव वापरावं, याबाबत उल्लेख केलेला नाही किंवा आपलं मतदेखील मांडलेलं नाही. उलट 2014 साली योगी आदित्यनाथ खासदार असताना त्यांनी इंडिया ऐवजी हिंदुस्तान नाव वापरण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर दुसरीकडे काँग्रेसच्या शांताराम नाईक या खासदारांनी 2010 आणि 2012 वर्षात खासगी विधेयक मांडून, भारत नाव वापरण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावेळेस त्यांना पाठिंबा मिळू शकला नाही. इतकंच नाही तर 2016 आणि 2020 या वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. मात्र हा अधिकार आम्हाला नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली होती. (India vs Bharat Issue Satish Dhage Reaction) त्यानंतर आता अचानकच भारत नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून आणण्यात आलाय. त्यामुळं विरोधकांच्या आघाडीचा संबंध लावण्यात येतोय. यात राजकीय हेतू स्पष्ट दिसून येतोय का? असा प्रश्न निर्माण झालाय.

नाव बदललं तर होऊ शकतो अनर्थ : देशाचं नाव बदललं तरी त्यात नवल नाही. याआधी तुर्की, हॉलंड या देशांनी आपली नाव बदललं आहे. त्यासाठी युनायटेड नेशनला एक पत्र देऊन देशाचं नाव आता भारत असेल, असं सांगावं लागेल. त्यानंतर आपल्याला हे नाव कायमस्वरूपी वापरता येईल. मात्र नुकत्याच आलेल्या माहितीनुसार भारताने जर असं केलं, तर हे नाव पाकिस्तान घेऊ शकतो, अशी भीती राजकीय विश्लेषक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलीय. सिंधू नदीच्या दक्षिणेला असलेला भाग त्याला इंडिया म्हणून ओळखला जात होता. पाकिस्तान देखील याच बाजूला येतो. फाळणी झाल्यावर मोहम्मद अली जिना यांनी भारताने इंडिया हे नाव न वापरता हिंदुस्तान हे नाव वापरावं, असं मत व्यक्त केलं होतं. तरी देखील संविधानात इंडिया हा शब्द घेण्यात आला. आज जर भारताने संविधानात बदल करून नाव सोडलं, तर पाकिस्तान हे नाव घेऊ शकतो. तसा प्रस्ताव साउथ एशिया इंडेक्सतर्फे देण्यात आलाय, असं मत देखील लेफ्टनंट करणार डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा :

  1. President of Bharat invitation: देशाशी संबंधित नावावर भाजपा का अस्वस्थ आहे? शरद पवारांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून प्रश्न उपस्थित
  2. Republic of Bharat : संसदेच्या विशेष अधिवेशनात 'इंडिया' नाव बदलणार? काँग्रेसचा जोरदार आक्षेप
  3. INDIA Meeting : 'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी

Last Updated : Sep 6, 2023, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.