छत्रपती संभाजीनगर Income Tax Raid Chhatrapati Sambhajinagar : प्राप्तिकर विभागाने दिवसभर शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या तब्बल वीस ठिकाणी धाडी टाकल्या (Income Tax Raid) आहेत. अचानक पन्नासहुन अधिक वाहनांमध्ये दोनशे कर्मचारी दाखल झाले आणि कोणाला काही कळण्याच्याधी कारवाईला सुरुवात केली. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिकांना धक्का बसलाय. या कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली गेली होती. अधिकाऱ्यांच्या हाती काही महत्वाचे दस्तावेज लागले असल्याची माहिती, सूत्रांनी दिलीय. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागातर्फे ही मोठी कारवाई करण्यात आलीय.
चार व्यावसायिकांवर एकाच वेळी छापे : सकाळी अचानक शहरातील अनिल मुनोत, महेश लाभशेटवार, नितीन बगडीया, शिरीष गादीया आणि मंजित प्राईडचे राजपाल यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. सकाळी सहा वाजेपासून या कारवाईस सुरुवात झाली. सुरुवातील 11 ठिकाणी कारवाई झाली. त्यानंतर मिळत गेलेल्या माहितीनुसार इतर ९ ठिकाणी देखील झाडाझडती घेतली गेली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास वीस ठिकाणी ही कारवाई आठ वाजेपर्यंत करण्यात आली. या करवाईबाबात मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. आर्थिक देवाणघेवाण आणि व्यवहार यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवस तरी चालेल कारवाई : शहरात बांधकाम व्यावसायिकांची संख्या वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी नवनवीन प्रकल्प सुरू होत असताना, अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांना धक्का बसलाय. या कारवाईचा धसका बांधकाम व्यवसायिकांसह इतरांना बसलाय. ही करावाई अजून एक ते दोन दिवस चालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर आयकर विभागाने अचानक धाडी टाकताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -