ETV Bharat / state

सिल्लोडमधील शिवारात भीषण आगीत घर व गोठा जळून खाक; 15 शेळ्या दगावल्या

औरंगाबाद जिल्ह्यातील धोत्रा शिवारात शेतातील घर व गोठ्यास भीषण आग लागून 15 शेळ्या मरण पावल्याअसून शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखापर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीसाहित्य, खते, औषधी, 15 क्विंटल धान्य जळून खाक झाले आहे. परिसरात एक विद्युत रोहित्र असल्यामुळे ही भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

A house and a cowshed were gutted in a fierce fire in the Shivara of Sillod; 15 goats were slaughtered
सिल्लोडमधील शिवारात भीषण आगीत घर व गोठा जळून खाक; 15 शेळ्या दगावल्या
author img

By

Published : May 1, 2021, 2:56 PM IST

औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील धोत्रा शिवारात शेतातील घर व गोठ्यास आग लागून 15 शेळ्या मरण पावल्याअसून शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखापर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे.

सिल्लोड तालुक्यातील धोत्रा गाव शिवारात राजेंद्र अमरसिंग जाधव व गजानन अमरसिंग जाधव यांच्या शेतात घरास व गोठ्यास रात्री अचानक आग लागून 10 ते 15 शेळ्या मरण पावल्या असून दोन बैल जखमी झाले आहेत. तसेच घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीसाहित्य, खते, औषधी, 15 क्विंटल धान्य जळून खाक झाले आहे. या आगीमुळे दोन्ही शेतकऱ्याचे जवळपास 5 लाखापर्यंत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

परिसरात एक विद्युत रोहित्र असल्यामुळे ही भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीसंदर्भात महावितरणचा कोणीही कर्मचारी पाहणी करण्यासाठी अजूनपर्यंत आला नसल्याची माहिती समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.