औरंगाबाद - अयोध्या राम जन्म भूमीचा निकाल हा ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र, या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते. मात्र त्या याचिकेचा फायदा होण्याची शक्यता कमी असल्याचे मत डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा- कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभात सिद्धू उपस्थित, इम्रान खानसह मोदींचे केले कौतूक
अयोध्या प्रकरणात आर्टिकल 142 आणि कलम 137 नुसार पुनर्विचार शक्य आहे. पुनर्विचार याचिका दाखल करताना काही निकष असतात. अयोध्या प्रकरणातील निकाल ऐतिहासिक निर्णय आहे. हा 70 वर्षाहून अधिक काळ चाललेला खटला होता. या काळात अनेक साक्षी पुरावे न्यायालयाने तापसले. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात अनुभवी आणि पहिल्या फळीतील पाच न्यायाधीशांनी अभ्यास करून हा निर्णय दिला. एक हजारांहून अधिक पानांचा निकाल असून या निकालाचा अभ्यास करून मुस्लिम पर्सनल बोर्ड पुढील निर्णय घेऊ शकतो. मात्र, पुनर्विचार याचिका करण्याचा निर्णय झाल्यावर ती याचिका दाखल करून घेण्याचा अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाला असेल. काही पुरावे तपासायचे राहिले असतील आणि त्यामुळे जर निर्णय बदलण्याची शक्यता असेल तर याचिका दाखल केली जाऊ शकते. अन्यथा निर्णयात बदल होईल अशी शक्यता नसल्याचं मत कायदे अभ्यासक माजी लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.