ETV Bharat / state

जोरदार शक्तीप्रदर्शन करत इम्तियाज जलील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे जलील यांनी सांगितले.

इम्तियाज जलील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Apr 3, 2019, 9:22 PM IST

औरंगाबाद - एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे जलील यांनी सांगितले. यावेळी जलील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जलील हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून इम्तियाज यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली. यावेळी जलील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सध्याचे खासदार चंद्रकांत खैरै यांचा पराभव करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील भडकल दरवाजा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोठी प्रचाररॅली काढत इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

इम्तियाज जलील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

या रॅलीत तरूणांची उपस्थिती लक्षणीय होती.जलील यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्याने आता औरंगाबादची लढत शिवसेना विरुद्ध एमआयएम होणार हे आता स्पष्ट झाले आहे. जलील यांच्या उमेदवारीने काँग्रेसला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासासाठी निवडणूक लढवत असून, आपण कोणत्या एका जातीसाठी किंवा समाजासाठी निवडणूक लढवत नसून सर्व धर्मीय लोक माझ्यासोबत आहेत. त्यामुळे लोकसभेची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

Intro:एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. औरंगाबादचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं आमदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितलं.Body:औरंगाबादच्या भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या इम्तियाज यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली.Conclusion:औरंगाबादचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. मोठं शक्तीप्रदर्शन करीत जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, यावेळी सध्याचे खासदार चंद्रकांत खैरै यांचा पराभव करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील भडकल दरवाजा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोठी प्रचाररँली काढत इम्तियाज जलील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या रँलीत तरूणांची उपस्थिती लक्षणीय होती,  जलील यांनी लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्यानं आता औरंगाबादची लढत शिवसेना विरुद्ध एमआयएम होणार हे आता स्पष्ट झालं आहे, जलील यांच्या उमेदवारीनं काँग्रेसला मात्र जबर फटका बसण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासासाठी निवडणूक लढवत असून आपण कोणत्या एका जातीसाठी किंवा समाजासाठी निवडणूक लढवत नसून. सर्व धर्मीय लोक माझ्यासोबत असून ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.
बाईट.. इम्तियाज जलील, एमआयएम आमदार,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.