ETV Bharat / state

औरंगाबाद : रुग्ण संख्या वाढत राहिली, तर लागणार लॉकडाऊन अटळ! - aurangabad corona news

गुरुवारी दिवसभरात 275 नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या 49566 इतकी झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाच्या नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.

If the number of patients continues to increase lockdown will be impose in aurangabad
औरंगाबाद : रुग्ण संख्या वाढत राहिली, तर लागणार लॉकडाऊन अटळ!
author img

By

Published : Feb 26, 2021, 6:57 AM IST

औरंगाबाद - कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत असून गेल्या चार दिवसांपासून रोज दोनशेहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी दिवसभरात 275 नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या 49566 इतकी झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाच्या नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी 72 जणांना (मनपा 50, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 46793 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 1511 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

प्रतिक्रिया

नव्याने चार कोरोनाबाधितांचा मृत्यू -

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत आजपर्यंत एकूण 1262 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरूवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात घाटीत बीड बायपास सातारा परिसरातील 73 वर्षीय पुरूष, गडलिंब, गंगापुरातील 50 वर्षीय स्त्री, देवा नगर येथील 80 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील 73 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा - ग्रामीण भागाला दिलासा! ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या परवानगीची अट शिथील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.