औरंगाबाद - विद्यार्थ्यांना कॉफी पुरवण्यासाठी उत्तरे तयार करताना शिक्षण विभाग व पोलिसांनी छापा मारून केंद्र संचालकासह ६ जणांना मंगळवारी अटक केली. हा प्रकार औरंगाबादच्या वाळूज रांजणगाव शेणपुंजी येथे १२ वीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला मंगळवारी सुरुवात झाली. या परीक्षेसाठी वाळूज परिसरात सहा परीक्षा केंद्र आहेत. रांजणगाव शेणपुंजी येथील श्री गजानन ज्युनियर कॉलेज हे त्यातील एक केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर वाळूज येथील महाराष्ट्र ज्युनिअर कॉलेजच्या सहशिक्षिका रत्नमाला दामोदर कदम या केंद्र संचालक आहेत. तर शिक्षक महाराष्ट्र पब्लिक स्कूल वाळूजचा प्रशांत गोरख मरकड, ख्राईस्ट चर्च छावणी, औरंगाबादचा शिक्षक शरणाप्पा साधू रक्षाळकर, शिक्षक कल्याण रघुनाथ कुलकर्णी, पी.एम. ज्ञानमंदिरचा शिक्षक लंकेश हिरालाल महाजन, प्रयोगशाळा सहायक अक्षय प्रकाश आर्के. हे सर्वजण परीक्षेचा पहिलाच पेपर सुरू असताना केंद्राच्या प्रयोगशाळेतील एका खोलीत बारावीच्या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे तयार करताना मिळून आलीत.
हेही वाचा - बस चालक-वाहकास बेदम मारहाण, 18 जणांवर गुन्हा दाखल, 3 जण ताब्यात
ही माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी दौलतराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रीती फड यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केली असता हे सर्व आरोपी शिक्षक परीक्षेतील प्रश्नाची उत्तरे तयार करताना मिळून आली. प्रारंभी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी या प्रकाराची माहिती शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांना दिली. या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.