ETV Bharat / state

हर्षवर्धन जाधवांचा 'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' विधानसभेच्या 6 जागा लढवणार - विधानसभा निवडणूक 2019

कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी 3 महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देत शिवस्वराज बहुजन पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत 2 लाख 83 हजार मते घेतली होती. हर्षवर्धन यांनी मिळालेल्या मतांमुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता.

'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' विधानसभेच्या 6 जागा लढवणार
author img

By

Published : Sep 16, 2019, 9:43 PM IST

औरंगाबाद - लोकसभा निवडणूकीत शिवसेनेला धक्का देणारा 'शिवस्वराज बहुजन पक्ष' आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत पक्षातर्फे स्वतंत्रपणे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा जागा लढवण्यात येणार आहेत. शहरातील 3 आणि कन्नड, गंगापूर आणि वैजापूर अशा 6 जागा असणार आहेत.

'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' विधानसभेच्या 6 जागा लढवणार

हेही वाचा - महापोर्टलमध्ये मध्यप्रदेशातील व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा - राजू शेट्टी

कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी 3 महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजीनामा देत शिवस्वराज बहुजन पक्षाच्या माध्यमातून निवडणुक लढवत 2 लाख 83 हजार मते घेतली होती. हर्षवर्धन यांनी मिळालेल्या मतांमुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत हर्षवर्धन जाधव यांनी किंग मेकरची भूमिका बजावली होती. तर आता विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - औरंगाबादेत सर्पदंशाने पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

पक्षातर्फे कन्नड मतदारसंघातून स्वत: हर्षवर्धन जाधव निवडणूक लढवणार आहेत. यासह औरंगाबाद पुर्व, पश्‍चिम आणि मध्य या तीनही जागेवर पक्ष निवडणुक लढवणार आहे. यासह लोकसभेत गंगापुर आणि वैजापुरातून हर्षवर्धन यांना मोठी मते मिळाली होती. त्यामूळे गंगापूर आणि वैजापुरलाही उमेदवार देत निवडणुकीत पक्ष आपले निशिब आजमावणार आहे.

तसेच निवडणूकीत शिवस्वराज पक्ष कोणालाही पाठिंबा देणार नाही. तसेच कोणाचाही पाठिंबाही घेणार नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेत सेनेला धक्का देणारे हर्षवर्धन जाधव विधानसभेत कोणा-कोणाला धक्के देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत धक्का देणारा शिवस्वराज बहुजन पक्ष आता विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे स्वतंत्रपणे औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा जागा लढविणार आहे. शहरातील तीन आणि कन्नड,गंगापूर आणि वैजापूर अशा सहा जागा असणार आहेत. अशी माहिती हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. Body:कन्नडचे माजी आमदार असलेले हर्षवर्धन जाधव यांनी तीन महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा राजिनामा देत शिवस्वराज बहुजन पक्षाच्या माध्यमातून निवडणुक लढवत 2 लाख 83 हजार मते घेतली होती. हर्षवर्धन यांनी मिळालेल्या मतांमूळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव होते, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत किंग मेकरची भूमिका बजावली असून आता विधानसभा निवडणुकीत आपली ताकद आजमावणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं.Conclusion:पक्षातर्फे कन्नड मतदारसंघातून स्वत: हर्षवर्धन जाधव निवडणुक लढविणार आहे. यासह औरंगाबाद पुर्व, पश्‍चिम आणि मध्य या तीनही जागेवरून निवडणुक लढविणार आहे. यासह लोकसभेत गंगापुर आणि वैजापुरातून हर्षवर्धन यांना मोठी लिड मिळाली होती. यामूळे गंगापूर आणि वैजापुरलाही उमेदवार देत निवडणुकीत आपले निशीब आजमावणार आहेत. विधानसेभेच्या निवडणुकीत शिवस्वराज पक्षा कोणालाही पाठिंबा देणार नाही, आणि कोणाचा पाठिंबाही घेणार नसल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेत सेनेला धक्का देणारे हर्षवर्धन जाधव विधानसभेत कोणाकोणाला धक्के देणार हे पाहण्यासारखं असेल.
Byte - हर्षवर्धन जाधव - माजी आमदार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.