औरंगाबाद - साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले वक्तव्य वैयक्तिक असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या मिरवणुकीत त्यांनी हे मत मांडले.
साध्वी प्रज्ञा सिंहला कुठलाही पुरावा नसताना अटक केली. न्यायालयात कुठलेही पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे प्रज्ञा सिंह यांना राग आहे. त्यामुळे त्या व्यक्त झाल्या असून त्यांनी त्यांचे वैयक्तिक मत व्यक्त केले, असे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आम्ही करत असून निवडणूक प्रचार यंत्रणा सक्षम आहे. मतदानाच्या दिवशी मतदान करून घेण्यासाठी देखील भाजपची यंत्रणा तयार असून जास्तीत जास्त मतदान भाजप करून घेईल, अस देखील हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. हरिभाऊ बागडे रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी पिसादेवी भागात आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले.