ETV Bharat / state

खुलताबादमध्ये साध्या पद्धतीने पार पडली हनुमान जयंती - हनुमान जयंती

भारतात दोनच ठिकाणी निद्रीस्त अवस्थेतील मारूती मंदिर आहेत. त्यापैकी एक औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद येथे भद्रा मारूती या नावाने प्रसिद्ध आहे. हनुमान जयंती निमित्त जवळपास 10 लाख भाविक दर्शनासाठी येथे येतात. मात्र, यावेळी प्रशासनाच्या आदेशाने मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.

हनुमान जयंती
हनुमान जयंती
author img

By

Published : Apr 8, 2020, 4:42 PM IST

Updated : Apr 8, 2020, 5:20 PM IST

औरंगाबाद - यंदा हनुमान जयंतीवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होणारी हनुमान जयंती यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. औरंगाबादच्या भद्रा मारोती येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दोन पुजारी आणि पोलिसांच्यासोबत आरती करून हनुमान जयंती साजरी केली.

भारतात दोनच ठिकाणी निद्रीस्त अवस्थेतील मारूती मंदिर आहेत. त्यापैकी एक औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद येथे भद्रा मारूती या नावाने प्रसिद्ध आहे. हनुमान जयंती निमित्त जवळपास 10 लाख भाविक दर्शनासाठी येथे येतात. मात्र, यावेळी प्रशासनाच्या आदेशाने मंदिर बंद असल्याने भक्तांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.

हनुमान जयंती

कोरोनाचे सावट असल्यामुळे कोणताही सण साजरा करायला निर्बंध लावण्यात आले असल्याने हनुमान जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. औरंगाबादच्या भद्रा मारोती हनुमान जयंतीच्या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मोठा महोत्सव साजरा करण्यात येतो. मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप येते. मात्र, त्याच ठिकाणी जयंतीला मंदिर बंद ठेवण्यात आले. रात्री 12 आणि पहाटे पाच वाजता अशा दोन वेळा आरती केली जाते. मात्र, यावर्षी सकाळी पाच वाजताचीच आरती करण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते दोन पुजारी, पोलीस अधीक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थित साध्या पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली.

दरवर्षी आसपासच्या शहरातील आणि गावातील जवळपास पाच लाखांहून अधिक भाविक पायी दर्शनासाठी येतात. तर त्याहून जास्त भाविक वाहनांनी दर्शनासाठी खुलताबाद येथे दाखल होतात. लक्ष्मणासाठी संजीवनी घेउन जेव्हा मारूती निघाले, त्यावेळी याच ठिकाणी त्यांनी काही काळ विश्रांती घेतल्याची आख्यायिका आहे. भद्रसेन राजाने हे मंदिर बांधले त्यामुळे हे मंदिर भद्रा मारूती म्हणून नावारुपास आले आहे. हे मंदिर जागृत असल्याचे माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

मंदिर ट्रस्टतर्फे पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला तर पाच लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी देण्यात आले असून कोरोनापासून देशवासियांची लवकर सुटका व्हावी, अशी प्रार्थना आपण केल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

Last Updated : Apr 8, 2020, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.