ETV Bharat / state

औरंगाबाद : वेयर हाऊसच्या गोडाऊनला आग; लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक

author img

By

Published : May 23, 2021, 2:40 AM IST

भेंडाळा शिवारात संतोष आडगळे यांचे भाड्याने दिलेल्या ओमेगा वेयर हाऊसमधील तीन गोडाऊनला आग लागली. कापसाच्या गाठी असल्याने आगीने मोठा पेट घेतला. या आगीत लाखो रुपयांच्या कापसाच्या गाठी व अन्य साहित्य जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दल व गरवारे अग्निशमन दलास पाचारण केले.

गंगापूर आग
गंगापूर आग

गंगापूर(औरंगाबाद)- गंगापूर तालुक्यातील औरंगाबाद महामार्गा लगत असलेल्या ओमेगा वेयर हाऊसला भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये असलेला लाखो रुपयांच्या कापसाच्या गाठी व अन्य साहित्य जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भेंडाळा शिवारात संतोष आडगळे यांचे भाड्याने दिलेल्या ओमेगा वेयर हाऊसमधील तीन गोडाऊनला आग लागली. कापसाच्या गाठी असल्याने आगीने मोठा पेट घेतला. या आगीत लाखो रुपयांच्या कापसाच्या गाठी व अन्य साहित्य जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दल व गरवारे अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले, आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.