ETV Bharat / state

दक्षिण काशी पैठणनगरीत गोदावरीला गटाराचे स्वरुप - दक्षिण काशी पैठण

शहरातील ड्रेनेज लाईन तसेच सांडपाण्याचे दूषित पाणी फिल्टर न करता सरळ सात नाल्याच्या माध्यमातून नदीपात्रात सोडले जाते. गेल्या कित्येक वर्षापासून मिश्रीत सांडपाण्यामुळे गोदावरीचे जल प्रदुषण वाढतच आहे. मात्र नगरपालिकेने त्यावर अद्याप लक्ष दिले नाही. नाशिकमध्ये उगम पावणारी पवित्र गोदावरी नदी पैठणहून वाहत पुढे महाराष्ट्राच्या हद्दीत नांदेडपर्यंतचा परिसर सुजलाम सुफलाम करते. मात्र तिच्या या प्रवासात अनेक छोटे मोठे शहरे तिला दूषित करताना दिसून येत आहे.

दक्षिण काशी पैठणनगरीत गोदावरीला गटाराचे स्वरुप

author img

By

Published : Jun 6, 2021, 10:46 AM IST

पैठण (औरंगाबाद) - पैठण शहराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. अध्यात्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या या शहरातून वाहणाऱ्या नदीला पवित्र गंगा मानले जाते. त्याच गोदावरीला आता गटाराचे स्वरुप आले आहे. या गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणावर घाणीचे सम्रज्य पसरले आहे. गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे पैठणनगरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील ड्रेनेज लाईन तसेच सांडपाण्याचे दूषित पाणी फिल्टर न करता सरळ सात नाल्याच्या माध्यमातून नदीपात्रात सोडले जाते. गेल्या कित्येक वर्षापासून मिश्रीत सांडपाण्यामुळे गोदावरीचे जल प्रदुषण वाढतच आहे. मात्र नगरपालिकेने त्यावर अद्याप लक्ष दिले नाही. नाशिकमध्ये उगम पावणारी पवित्र गोदावरी नदी पैठणहून वाहत पुढे महाराष्ट्राच्या हद्दीत नांदेडपर्यंतचा परिसर सुजलाम सुफलाम करते. मात्र तिच्या या प्रवासात अनेक छोटे मोठे शहरे तिला दूषित करताना दिसून येत आहे.

पैठणमध्ये गोदावरीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नदीपात्रात वाळू माफियांनी नदीचे अस्तित्वच पुसून टाकले आहे. वाळू माफिया लाखो ब्रास वाळू या नदीपात्रातून चोरीछुपे उपसा करत आहेत. त्याखड्ड्यामध्ये शहरातील सांडपाणी कचरा येऊन साठतो आणि गोदावरीचे पाणी दूषित होते. सध्या पैठणमधील नदी पात्रातील पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे.

शहरातील ड्रेनेजचे दूषित पाणी गोदावरी नदीपात्रात प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच ठिकाणी हजारो भाविक गोदास्नानासाठी हजेरी लावतात. मात्र दूषित झालेले गोदावरीचे पाणी या भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी काही सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांनी नगरपालिकेकडे अनेकदा मागणी केली. मात्र, पालिकेकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नगरपालिकेने 1971 मध्ये सांडपाणी निचरा करण्यासाठी नदीपात्रालगत टाकी बांधली आहे. मात्र, अद्याप त्याचा उपयोग पाणी प्रक्रिया कऱण्यासाठी करण्यात आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.