ETV Bharat / state

औरंगाबादेत आंदोलन बंद पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा अजब फंडा; आंदोलक शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी केले बंद

औरंगाबादेत गोदावरी महामंडळाने आंदोलन बंद पाडण्यासाठी अजब फंडा वापरला आहे. भूसंपदानाच्या मागणीसाठी आंदोलक शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी बंद करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न गोदावरी महामंडळाने केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलन चिरडण्यासाठी शेतकऱ्यांचे पाणी केले बंद
author img

By

Published : Jun 5, 2019, 3:32 PM IST

औरंगाबाद - आंदोलन बंद पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अनेक वेळा अजब फंडे वापरतात. औरंगाबादेत गोदावरी महामंडळाने आंदोलन बंद पाडण्यासाठी अजब फंडा वापरला आहे. भूसंपदानाच्या मागणीसाठी आंदोलक शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी बंद करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न गोदावरी महामंडळाने केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

पैठण तालुक्यात ब्रह्मगव्हान उपसिंचन योजनेसाठी प्रस्तावित असलेली जमीन अधिग्रहण करण्याची मागणी 2012 पासून शेतकऱ्यांची होती. मागणी पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीन दिवसांपासून बेमुदत डेरा आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताना गोदावरी पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांना प्यायला पाणी ठेवलं नाही. महामंडळाच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी पिण्याचे माठ भरून ठेवण्यात आले होते. मात्र, आंदोलन सुरू होताच त्या माठांमध्ये पाणी ठेवणे बंद केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.

आंदोलक शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी केले बंद

काय आहे प्रकरण?
ब्राम्हगव्हान उपसासिंचन योजना 2009 रोजी मंजूर करण्यात आली. योजना मंजूर झाल्यावर पैठण तालुक्यातील पिंपळवाडी आणि इसारवाडी या गावांमधील 32 शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भूसंपादन कायद्यानुसार 2012 आणि 2013 चे भूभाडे देण्यात आले. मात्र नंतर 2016 मध्ये जमीन अधिग्रहण करण्याची गरज नसल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आठ वर्षे भूसंपादन करून अचानक निर्णय बदलल्याने शेतकऱ्यांची जमीन ना शेतीसाठी उपयुक्त राहिली ना कुठल्या व्यवसायासाठी त्यामुळे जमीन अधिग्रहण करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी बेमुदत डेरा आंदोलन सुरू करत केली आहे.

Intro:एखाद आंदोलन बंद पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अनेक वेळा अजब फंडे वापरत मात्र औरंगाबादेत गोदावरी महामंडळाने वापरलेला फंडा हा अतिशय अजब वाटला. भूसंपदानाच्या मागणीसाठी आंदोलक शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी बंद करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Body:पैठण तालुक्यात ब्रह्मगव्हान उपसिंचन योजनेसाठी प्रस्तावित असलेली जमीन अधिग्रहण करण्याची मागणी 2012 पासून शेतकऱ्यांची होती. मागणी पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीन दिवसांपासून बेमुदत डेरा आंदोलन सुरू केले आहे.

Conclusion:शासनाने मंजूर केलेल्या योजनेसाठी संपादित करण्याचं आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताना गोदावरी पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी चक्क माणुसकी विसरल्याच पाहायला मिळालं. आंदोलकांची समजूत काढूनही आंदोलन मागे घेत नसल्याने अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना प्यायला देखील पाणी ठेवलं नाही. महामंडळाच्या परिसरात सर्वसामान्यांसाठी पिण्याचे माठ भरून ठेवण्यात आले होते. मात्र आंदोलन सुरू होताच त्या माठांमध्ये पाणी ठेवण बंद केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय. ब्राम्हगव्हान उपसासिंचन योजना 2009 रोजी मंजूर करण्यात आली. योजना मंजूर झाल्यावर पैठण तालुक्यातील पिंपळवाडी आणि इसारवाडी या गावांमधील 32 शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भूसंपादन कायद्यानुसार 2012 आणि 2013 चे भूभाडे देण्यात आले. मात्र नंतर भूसंपादन करण्याच्या उद्देशाने संयुक्त मोजणी पार पडली. त्यामध्ये 35 मीटर जमीन घेण्याचा निर्णय झाला मात्र योजनेला लागणारी पाईपलाईन जमिनीखालून जाणार असल्याने 2016 मध्ये जमीन अधिग्रहण करण्याची गरज नसल्याचं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे आठ वर्षे भूसंपादन करून अचानक निर्णय बदलल्याने शेतकऱ्यांची जमीन ना शेतीसाठी उपयुक्त राहिली ना कुठल्या व्यवसायाच्या त्यामुळे जमीन अधिग्रहण करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मागणी मान्य होत नसल्याने गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत डेरा आंदोलन सुरू केलं. मात्र आंदोलन चिरडण्यासाठी गोदावरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चक्क पिण्याचे पाणी बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आंदोलक शेतकऱ्यांना विकतच पाणी घेऊन आपलं आंदोलन सुरू ठेवावं लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचा गवगवा करणाऱ्या या अधिकाऱ्यांमध्ये माणुसकी शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.