औरंगाबाद - विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कुणालाही बोलण्यास मुबा नसल्याचा आरोप भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. या बैठकीत विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाही बोलण्यास मुभा नाही, त्यामुळे अर्थसंकल्पात पुन्हा मराठवाड्याच्या पदरी निराशा येऊ शकते असा आरोप त्यांनी केला आहे. किमान बारामतीला देण्यात येणाऱ्या निधी इतका निधी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना मिळावा अशी अपेक्षा निलंगेकर यांनी व्यक्त केली.
प्रत्येक वेळी केंद्राचा निधी न मिळाल्याची ओरड
विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित केला तर प्रत्येक वेळी केंद्राकडे पैसे बाकी असल्याची ओरड राज्याचे मंत्री करत आहेत. नियोजन समितीच्या बैठकीत राज्याने केलेल्या नियोजनाबाबत बोलणे आवश्यक असते मात्र तिथेही केंद्राचा निधी मिळाला नाही असे बोलले जात आहे. या बैठकीला काही अर्थ नाही, अशा बैठका म्हणजे खोट्या बैठका असल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेलर यांनी केला.
उजनी पाणी मराठवाड्याला द्या
उजनीचे पाणी मराठवाड्याला देण्यात यावा अशी मागणी भाजपचे नेत्याकडून अनेक वेळा करण्यात आली. मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे. उजनीच्या पाण्यामुळे मराठवाड्याला मोठा फायदा होईल असा दावा भाजपाचे नेते निलंगेकर यांनी केला आहे. यासंदर्भात मराठवाडा नियोजन बैठकीत आम्ही बोललो तर आम्हाला यावर बोलू दिले नाही, असा आरोप देखील निलंगेकर यांनी केला.
हेही वाचा - ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी