ETV Bharat / state

रिक्षा चालकाच्या अश्लील वर्तनामुळे युवतीने धावत्या रिक्षातून मारली उडी - Aurangabad breaking news

रिक्षा चालकाने अश्लील वर्तन केल्याने प्रवासी असलेल्या युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षा चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असून

v
v
author img

By

Published : Aug 28, 2021, 5:01 PM IST

Updated : Aug 28, 2021, 7:00 PM IST

औरंगाबाद - रिक्षा चालकाने अश्लील वर्तन केल्याने प्रवासी असलेल्या युवतीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोंढा नाकाजवळ झालेल्या घटनेत युवती गंभीर जखमी झाली असून रिक्षा चालक फरार झाला आहे.

रिक्षा चालकाच्या अश्लील वर्तनामुळे युवतीने धावत्या रिक्षातून मारली उडी

चालत्या रिक्षातून मारली उडी

शनिवारी (दि. 28 ऑगस्ट) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी रिक्षात बसली. ती त्या रिक्षात एकटीच होती. रिक्षा चालकाने अश्लील भाषेत संभाषण सुरू केल्याने, तिने त्या रिक्षा चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र, चालक रिक्षा अजूनच वेगाने चालवू लागला. शेवटी घाबरून त्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली. रिक्षातून उडी मारल्याने तिला जबर मार लागला होता व ती खूप घाबरलेली होती.

युवकाने केली मदत

अॅब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे सदस्य निलेश सेवेकर हा आकाशवाणीकडे जात असताना हा सर्व प्रकार त्याच्या नजरेस पडला. त्याने जखमी अवस्थेतील असलेल्या मुलीकडे धाव घेतली. मात्र, ती मुलगी घाबरलेली होती. त्याने युवतीला धीर देत रस्त्याच्या कडेला घेतले. तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांना संपर्क साधत त्या मुलीच्या पालकांना तातडीने तिथे बोलावले. त्या युवतीवर कैलासनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

रिक्षा चालक झाला फरार

युवतीने रिक्षातून उडी घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यावेळी तिच्या मदतीसाठी काही लोक आली. त्यामुळे त्या रिक्षा चालकाला तिथे जमा झालेली गर्दी दिसली व तो लगेचच तिथून पळून गेला. थोड्या वेळाने त्या मुलीचे मामा व भाऊ त्या घटनास्थळी पोहचले व मुलीला तातडीने जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊन तिच्यावर उपचार करून सुखरूप घरी परत घेऊन गेले. पण, ती मुलगी खूप घाबरलेली होती. त्या मुलीचे धाडस आणि हेल्प रायडर्स निलेश याच्या तप्तरतेने पुढील अनर्थ टळला हे मात्र नक्की. या प्रकरणी जिंसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - टोमॅटोचे भाव घसरले, ट्रकभर टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा सरकारविरोधात संताप

Last Updated : Aug 28, 2021, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.