औरंगाबाद - ज्येष्ठ पत्रकार लंकेश गौरी यांच्या हत्येप्रकरणी 'एसआयटी'ने अटक केलेला हृषीकेश देवडीकर हा औरंगाबादेतील सिडको-एन 9 भागात पतंजलीचे दुकान चालवत होता. तो सुमारे अडीच वर्षे या परिसरात वास्तव्यास होता.
हेही वाचा- कुठल्याही धमकीला न घाबरता संमेलनाच्या उद्घाटनाला जाणार - उद्घाटक ना. धों. महानोर
हृषीकेश देवडीकर हा 2014 ते 2016 या कालावधीत औरंगाबाद शहरातील सिडको एन-9 भागातील यशवंत शुक्ला यांच्या एल-44 या घरात भाड्याने राहत होता. आई, वडील, पत्नी, मुलगी असा सहपरिवार तो येथे राहायचा. त्याचे नेहमी सोलापूरला येणे-जाणे होते. तेथे तो 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची वर्ग घ्यायचा. त्यासाठी तो क्वचितच औरंगाबादेत राहायचा, असे घरमालक यशवंत शुक्ला यांनी सांगितले.
हेही वाचा- भाजपच्या जळगाव जिल्हाध्यक्षाची आज निवड; खडसे, महाजन गटात संघर्ष
सिडको भागातील सोनामात शाळेजवळ जगदीश कुलकर्णी यांचे 2014 मध्ये हृषीकेशने दुकान भाड्याने घेतले होते. तेथे त्याने पतंजलीचे दुकान सुरू केले होते. त्या दुकानात हृषीकेशची पत्नी, आई, वडील व तो स्वतः बसायचा. मात्र, ते दुकान त्याने नोटाबंदी झाल्यानंतर 2016 मध्ये सामनासहित कुलकर्णी यांना दिले.