औरंगाबाद- गौरी लंकेश यांच्या हत्ते प्रकरणी हृषिकेश देवडीकर याला झारखंड येथून एटीएसने अटक केली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येत हृषिकेश मुख्य असल्याचा संशय असल्याने त्याला ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा- #CAA #NRC आणि #NPR विरोधात २४ जानेवारीला महारॅली; शरद पवार करणार नेतृत्व
हृषिकेश देवडीकर औरंगाबादेत काही वर्षे वास्तव्यास असल्याच समोर आले आहे. हृषिकेश औरंगाबादच्या सिडको परिसरात ऐन 9 भागात पतंजलीचे दुकान चालवत होता. 2016 मध्ये त्याने दुकान समानासह दुकान मालकाला देऊन तो कुटुंबीयांसह शहरातून निघून गेला, अशी माहिती दुकानाचे मालक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.