ETV Bharat / state

औरंगाबादमधील ऐतिहासिक दरवाजांच्या आकर्षक प्रतिकृती, पाहा VIDEO

औरंगाबाद शहरातील इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या दरवाजांच्या प्रतिकृती तयार करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद देत राज्यभरातून 60 ते 70 कलाकारांनी उत्तम कलाकृती तयार करून दिल्या आहेत. यात मकई दरवाजा, भडकल दरवाजा, दिल्ली दरवाजा, रंगीत दरवाजा यांसह शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळ टॉवर यांच्या सुंदर प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.

gate competition in Aurangabad,
औरंगाबादच्या ऐतिहासिक दरवाज्यांचा इतिहास होणार जिवंत
author img

By

Published : Jul 3, 2021, 1:31 PM IST

Updated : Jul 3, 2021, 1:49 PM IST

औरंगाबाद - दरवाजांचे शहर अशी ओळख औरंगाबादला होती. कालांतराने दरवाजे नष्ट झाले, मात्र ओळख आजही कायम आहे. एकेकाळी 52 दरवाजे असलेल्या शहरात आज फक्त 17 दरवाजे डौलात उभे आहेत. या दरवाजांचे महत्व कळावे याकरीता महानगरपालिकेने दरवाजे बनवा स्पर्धा आयोजित केली होती. याला चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबादसह राज्यातून अनेक कलावंतांनी या दरवाजांच्या सुबक प्रतिकृती तयार करून पाठविल्या आहेत.

औरंगाबादच्या ऐतिहासिक दरवाज्यांचा इतिहास होणार जिवंत

इतिहास जिवंत ठेवण्यासाठी केला मनपाने प्रयत्न -

औरंगाबादचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. तसाच प्रयत्न मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय करत आहेत. त्यामुळेच 2020 मध्ये शहरातील ऐतिहासिक दरवाज्यांच्या प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा पालिकेने आयोजित केली. या स्पर्धामुळे कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि शहरातील इतिहासाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल. या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केल्याची माहिती महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे संजीव सोनार यांनी दिली.

राज्यभरातील कलाकारांनी तयार केल्या सुबक कलाकृती -

औरंगाबाद शहरातील इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या दरवाजांच्या प्रतिकृती तयार करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद देत राज्यभरातून 60 ते 70 कलाकारांनी उत्तम कलाकृती तयार करून दिल्या आहेत. यात मकई दरवाजा, भडकल दरवाजा, दिल्ली दरवाजा, रंगीत दरवाजा यांसह शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळ टॉवर यांच्या सुंदर प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. यात प्लायवूड, पुष्ठा, पीओपीचा वापर करून रौशनाई सह या कलाकृती सादर केल्या आहेत. उत्कृष्ट कलाकृती असलेल्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन लवकरच भरवण्यात येणार आहे. त्यातून चांगल्या कलाकृतींना बक्षीस देखील देण्यात येईल अशी माहिती सोनार यांनी दिली आहे.

कोरोनामुळे प्रदर्शनास उशीर -

कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. ऐतिहासिक ओळख सांगणाऱ्या कलाकृती मनपाला मिळाल्या असल्या तरी त्याचे प्रदर्शन कोरोनामुळे भरवणे शक्य झाले नाही. मात्र परिस्थिती सुधारताच त्याचे प्रदर्शन भरवले जाईल. तसेच या कलाकृती साकारणाऱ्या उत्तम कलाकारांचा सन्मान केला जाईल असे सोनार यांनी सांगितले.

हेही वाचा - अजिंठा लेणीवर कविता; लेणी जगविख्यात, शायर मात्र गुमनाम

Last Updated : Jul 3, 2021, 1:49 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.