ETV Bharat / state

Friend Killed : मित्रच बनला वैरी; दाढीला हात का लावला म्हणत मित्रालाच भोसकले, भजे खाता खाता केले 'कांड'

दाढीला हात ( touching beard ) लावल्याने मित्राची हत्या ( Killing a friend by touching his beard ) केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पिंपळवाडी ( Friend killed in Pimpalwadi ) येथे घडली.

author img

By

Published : Oct 19, 2022, 3:56 PM IST

Friend Killed
Friend Killed

औरंगाबाद - दाढीला हात लावल्याने ( touching beard ) मित्राची हत्या ( Killing a friend by touching his beard ) केल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील पिंपळवाडी ( Friend killed in Pimpalwadi ) येथे घडली. हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या झाली. घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

किरकोळ वादातून हत्या- अब्दुल उर्फ सांडु कम्मा शेख (वय-35 वर्ष रा.पिंपळवाडी पिराची ता.पैठण ), रामेर उर्फ राम गजेसिंग बोत (वय-38 वर्ष रा. साखर कारखाना कॉलनी एमआयडीसी ता. पैठण ) दोघेही मित्र आहेत. मंगळवार दुपारी अडीचच्या सुमारास दोघेही पैठण-औंरगाबाद महामार्गावरील पिंपळवाडी येथे एका हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी गेले होते. मात्र, याचवेळी राम बोत याच्या दाढीला मयत सांडु शेख याने हात लावला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. राम याने बाजूला असलेल्या अंडा आम्लेटच्या दुकानात असलेल्या कांदा कापण्याच्या चाकुने सांडू याच्या पाठीत दोन वार केले. यामध्ये सांडू हा गंभीर जखमी झाला, त्याला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपीला काही तासात अटक - पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल यांच्यासह सपोनि भागवत नागरगोजे यांनी तात्काल घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ईसारवाडी शिवारातील एका ऊसात लपून बसलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ शफिक शेख यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.