ETV Bharat / state

Four Youths Drowned Godavari : नदीवर पाणी आणणे बेतले जीवावर; गोदावरीत बुडून चार तरुणांचा मृत्यू - कायगाव टोका

कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), अक्षय भागिनाथ गोरे (वय 20) शंकर पारसनाथ घोडके (वय 22) अशी मृताची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Four Youths Drowned Godavari
गोदावरीत नदीत चार तरुण बुडाले
author img

By

Published : Mar 11, 2023, 8:40 PM IST

Updated : Mar 11, 2023, 9:02 PM IST

गोदावरीत नदीत चार तरुण बुडाले

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर, पुणे महामार्गालगत कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दु:खद घटना शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील काही तरुण पाणी आणण्यासाठी कायगाव टोका येथे आले होते. गोदावरी नदीत उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे.

पालखेड गावावर शोककळा : प्राथमिक माहितीनुसार, या चौघांमध्ये बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), अक्षय भागीनाथ गोरे (वय 20) आणि शंकर पारसनाथ घोडके (वय 22) यांचा समावेश आहे. दरम्यान, शंकर पारसनाथ घोडके यांचा मृतदेह सापडला असून, अन्य तिघांचे मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे. हे चौघेही वैजापूर तालुक्यातील पालखेड गावचे रहिवासी आहेत.

घटनास्थळी मोठी गर्दी : कायगाव येथील गोदावरी नदीत चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांकडून मुलांचा शोध घेतला जात आहे. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुलांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पाण्यात बुडालेल्या आणखी तिघांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

कमांडोचा पाण्यात बुडून मृत्यू : दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील कमांडोंची नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एक कमांडोचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही कमांडो गीते यांचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली असून दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

मोटारसायकल कालव्यात पडली : मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील एसपीजी कमांडो गणेश गीते हे २४ फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुक्यातील मेंढी या त्यांच्या गावात सुट्टीसाठी आले होते. गुरुवारी सकाळी ते पत्नी, मुलगा, मुलीसह साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. नांदूरमधमेश्वर येथील उजवा कालव्यावरून गीता कुटुंबीय घरी जात असताना गणेश गीता यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटुन ते कालव्यात पडले होते.

हेही वाचा - Nitin Gadkari On Palkhi Marg : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पालखी मार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा

Last Updated : Mar 11, 2023, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.