ETV Bharat / state

Chhatrapati Sambhajinagar Riot Case: छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणी आणखी चौघांना अटक, 'एसआयटी' पथक स्थापन

छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी झालेल्या दंगल प्रकरणी आणखीन चार जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी, 400 जणांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी 30 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात सात जणांना अटक केल्यानंतर, रात्री आणखीन चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अटक असलेल्या आरोपींची संख्या 11 वर पोहचली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Riot Case
छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरण
author img

By

Published : Apr 1, 2023, 3:38 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): रामनवमीच्या रात्री खिराडपुरा भागात जमावाणे दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेत 14 वाहने जाळण्यात आली तर 17 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जातीय दंगल घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सुदैवाने या प्रकरणाचे पडसाद शहरात इतर भागांमध्ये उमटले नाहीत. तरी प्रकरणात गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी एसआयटी पथक नेमले असल्याची माहिती दिली आहे. सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक संभाजी पवार यांच्या मुख्य तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्याबरोबर जीन्सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल मगरे, सायबर सेलचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण, गुन्हे शाखेचे कल्याण शेळके, वेदांत नगर पोलीस ठाण्याचे उत्तरेश्वर मुंडे, सिटी चौक पोलीस ठाण्याचे रोहित गांगुर्डे, मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे बाळासाहेब आहेर, या पोलीस अधिकाऱ्यांसह हवालदार अरुण वाघ, संजय गावंडे, सुनील जाधव यांचा या तपास पथकात समावेश करण्यात आला आहे.

आणखी चौघांना अटक: रामनवमीच्या रात्री पहाटे तीन वाजेच्या जवळपास राम मंदिर परिसरात जमावाने दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत शुक्रवारी सात आरोपींना अटक केली. तर आणखी चार आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शौकत चांदशहा, अरबाज, रिजवान शेख पाशु, शेख मुनीरुद्दीन शेख मोईनुद्दीन, अल्ताफ फिरोज, मौलाना हाश्मी इत्तरवाले यांचा मुलगा यांच्यासह 400 ते 500 जणांवर जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल केला. तर दंगलीत एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेख मुनिरुद्दीन शेख मेहुद्दीन असे मृताचे नाव असून गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असली तरी, त्याचा मृत्यू हा अपघाती असल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर खान अजगर खान असे मृताचे नाव असून तो दिल्ली गेट येथे जखमी अवस्थेत सापडला होता. त्याची नोंद घाटी रुग्णालयात करण्यात आली अशी माहिती देखील समोर आली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हेही वाचा: LPG Cylinder New Price : एलपीजी सिलिंडर झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.