ETV Bharat / state

पैठण तालुक्यात आढळला पहिला कोरोनाबाधित रुग्ण; प्रशासनात खळबळ

author img

By

Published : May 21, 2020, 5:51 PM IST

शासकीय रुग्णालयात कर्तव्य बजावण्यासाठी औरंगाबादवरुन ये-जा करणाऱ्या परिचारकाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे पैठण शहरात खळबळ उडाली आहे.

Patient
पैठण शासकीय रुग्णालय

औरंगाबाद - पैठण येथील शासकीय रुग्णालयातील परिचारकाला (ब्रदर) कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तातडीची बैठक घेत उपाययोजना करण्यास सुरुवात केली. परिचारकाच्या संपर्कात येणाऱ्या 81 संशयितांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाधित परिचारक औरंगाबादेतील रहिवासी असून शासकीय रुग्णालयात कर्तव्य बजावण्यासाठी औरंगाबादवरुन ये-जा करायचा. शासकीय कर्मचाऱ्यांना पैठण शहरातच राहून कर्तव्यावर असणे प्रशासनाने सक्तीचे केले होते. त्यामुळे शहरातील नाथ महाराज यांच्या मंदिरातील भक्त निवास याठिकाणी तो राहत होता.

अनेक कर्मचारी वारंवार सांगूनही नियमांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसापासून येत होत्या. याच मनमानीचे फलित आज पैठणकरांना भोगावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

उद्या 22 मेपासून औरंगाबाद शहर ते पैठणदरम्यान एसटी महामंडळ आणि दुसऱ्या माध्यमातून दळणवळण सुरू करण्याचा निर्धार सुरू आहे. मात्र पैठण शहरात पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने हा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.