ETV Bharat / state

'..तर गंगापूर कृषि आधिकारी कार्यालयास टाळे ठोकणार' - पीक विमा न्यूज

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ पीक विमा मंजुर करा. तसेच हेतु परस्पर सूड भावनेने गंगापूर खुलताबाद तालुक्यातील (गंगापूर तालुक्यातील ५३ गावांसह) शेतक-यांचा वगळलेला पिकविमा तात्काळ मंजुर न केल्यास मंगळवार ०८ जूनपासून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा मंजुर होईपर्यंत गंगापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे.

गंगापूर न्यूज
'हक्काचा पीक विमा मिळाला नाही, तर गंगापूर कृषि आधिकारी कार्यालयास टाळे ठोकणार'
author img

By

Published : May 31, 2021, 4:12 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - खरीप हंगाम २०२०-२१ मधील अतिवृष्टीने संपूर्ण पिके उध्वस्त होऊनही गंगापूर खुलताबाद तालुक्यातील (तालुक्यातील ५३ गावांसह) शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा हेतू परस्पर वगळल्याने पीक विमा मंजूर होईपर्यंत 8 जूनपासून गंगापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांनी दिला आहे.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांना दिले निवेदन -

कृषी मंत्री दादाजी भुसे व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२०-२१ या वर्षातील संपूर्ण जिल्ह्यासह गंगापूर – खुलताबाद तालुक्यात सुध्दा अतिवृष्टीने व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कपाशी, मक्का, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमुग, तुर, यासह फळबाग धारकाचे पूर्ण हातात आलेली पिके उध्वस्त झाली होती. म्हणून दि. ९ नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णयाव्दारे शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकरी नागरीकांना मदत देण्याबाबत शासन निर्णय जारी केले. त्या आधारे मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दि. १०/११/२०२० रोजी गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना तातडींची मदत म्हणून गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना २७ कोटी २८ लक्ष ६२ हजार २५० रु. तर खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ कोटी २० लक्ष ३० हजार ६७२ रु. वाटप केले. असे असताना म्हणजेच शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान मान्य करुनही २०२०-२१ च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी आपले सोने नाणे गहान ठेऊन भरलेला पिक विमा का वगळला असा प्रश्न अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ पीक विमा मंजुर करा

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तात्काळ पीक विमा मंजुर करा. तसेच हेतु परस्पर सूड भावनेने गंगापूर खुलताबाद तालुक्यातील (गंगापूर तालुक्यातील ५३ गावांसह) शेतक-यांचा वगळलेला पिकविमा तात्काळ मंजुर न केल्यास मंगळवार ०८ जूनपासून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा मंजुर होईपर्यंत गंगापूर तालुका कृषि अधिकारी कार्यालयास टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे. याची गंभीर दखल घ्यावी व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन / प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.