गंगापूर (औरंगाबाद) : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्यामुळे दलदल आणि पक्ष्याचे खाद्य घटले. परिणामी पर्यटकांना व पक्षीप्रेमींना (tourists and bird lovers) भुरळ घालणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाचे (flamingo bird) आगमन झाले नसल्याने पक्षीप्रेमींना फ्लेमिंगो पक्षाची प्रतीक्षा लागली आहे.
हिवाळ्यात अनेक देशी-विदेशी पक्षांची असते हजेरी : जायकवाडी बॅकवॉटर (Jayakwadi backwater) गोदावरी नदीच्या परिसरात पक्षांना आवडणारी दलदल, पानवनस्पती, छोटे मासे शेवाळ, कीटक आदी खाद्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असते. त्यांचे खाद्य पाण्यात सापडत असल्याने ते शक्यतो पाणथळ जमिनीवर आढळतात, त्यामुळे जायकवाडी बॅकवॉटर गोदावरी परिसर हा देशी-विदेशी पक्षांचा आवडीचे ठिकाण आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मोठ्या संख्येने पक्षी या भागात येत असतात. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून अजून तरी या भागात पक्षी दिसून आले नाही.
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले : फ्लेमिंगो पक्षी हे सतत एका ठिकाणी वास्तव्यास राहत नाही. हवामान बदलानुसार हे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात मात्र यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने परिसरात दलदल,पाणथळ जागा उपलब्ध नाही त्यामुळे या पक्षांना निवारा होण्यासाठी अडथळे होत असल्याने अजून तरी या भागात पक्षी दिसून आले नाहीत त्यामुळे पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमींना या पक्षाची प्रतीक्षा लागली आहे.
देश विदेशातील पक्षी लावतात हजेरी : देशी पक्षाबरोबरच दक्षिण आफ्रिका चीन रशिया नेपाळ तिबेट अधिदेशातील दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची ही जवळपास 60 ते 70 प्रजाती धरण क्षेत्राच्या बॅकवॉटरला हजेरी लावतात पर्यटकांना आणि पक्षीप्रेमींना भुरळ घालणाऱ्या मुख्य फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी अनेकजण पसंती देतात, फ्लेमिंगो चा रंग पांढरा गुलाबी किंवा लालसर असतो त्याचा गळा लांब असतो काठी सारखे पाय तर पंख गुलाबी लालसर असतात तर चोच गुलाबी आणि काळ्या रंगाची असते आणि मान लांब असते दिसायला खूपच सुंदर असलेली हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी प्रेमी खास धरण क्षेत्रावर हजेरी लावतात मात्र अजून या भागात हे पक्षी दिसून आले नाहीत.
फ्लेमिंगोच्या चार प्रजाती : फ्लेमिंगो हे (Phoenicopteridae) कुटुंबातील पक्षी आहेत जे पाण्याच्या काठावर अन्न शोधतात. जैविक दृष्टिकोनातून, ते फोनीकॉप्टेरिफॉर्मेस ऑर्डर अंतर्गत येतात. फ्लेमिंगोच्या चार प्रजाती अमेरिका (उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंड) आणि दोन आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये राहतात.