ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये आढळला कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण; शासकीय रुग्णालयात दाखल

रुग्णाला कोरोना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले असून डॉक्टरांनी रुग्णाच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहे. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसांचा कलावधी लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

corona patient aurangabad
प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 12, 2020, 6:17 PM IST

औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळला आहे. रुग्ण १६ वर्षीय युवक असून तो उत्तरप्रदेशातून आपल्या भावाला भेटण्यासाठी जिल्ह्यात आला होता. प्रकृती बिघडल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

रुग्णाला कोरोना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले असून डॉक्टरांनी रुग्णाच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहे. नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यास दोन दिवसाचा कलावधी लागणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील मीनी घाटी आणि मुख्य घाटी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणा तयार आहेत. दरम्यान, संशयित रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला त्या लोकांना देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा- 'कोरोनावरुन घाबरवलं जातंय'... राज ठाकरेंची सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.