ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये किराणा दुकानाला भीषण आग; घटनास्थळी पोहचण्यात अग्निशमनदलाचा हलगर्जीपणा

औरंगाबादमध्ये अयोध्यानगर भागात एका किराणा दुकानाला आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्याने सर्व दुकान जळून खाक झाले.

आगीत जळून खाक झालेले किराणा दुकान
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:09 PM IST

औरंगाबाद - अयोध्यानगर भागात एका किराणा दुकानाला आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्याने सर्व दुकान जळून खाक झाले. या घटनेत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालकाने व्यक्त केला आहे.

औरंगाबादमध्ये आयोध्यानगर भागात एका किराणा दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली

अयोध्यानगर भागात राजू मोरे (रा.वाळूंज महानगर) यांचे 'समीक्षा किराणा' दुकान आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुकानातून धूर घरात येत असल्याने मोरे झोपेतून जागे झाले. त्यांनी जाऊन पाहिले असता दुकानात आगीचे लोळ दिसत होते. दुकानात लागलेली आग पाहून घरातील महिलांनी आरडाओरड केला.

हेही वाचा - अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या अमेरिकन पर्यटकांचे हाल; पर्यटक संख्या घटण्याची भीती

रहिवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग जास्त पसरल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाच्या क्रमांकावर संपर्क करून आगीची माहिती दिली. बराचवेळ होऊनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेच नाही. त्यामुळे काही नागरिक थेट अग्निशमन कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना घेऊन आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात आले होते. अग्निशमन दलाचे बंब वेळीच घटनास्थळी दाखल झाले असते, तर झालेले नुकसान टळले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सणासुदीचे दिवस असल्याने मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच दुकानात माल भरला होता. वाळूंज एमयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Intro: किराणा दुकानाला आज पहाटेच्या सुमारास बजाजनगर मधील आयोध्यानगर भागात भीषण आग लागली होती. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.अग्निशमन दल वेळेवर न पोहोचल्याने सर्व दुकान जळून खाक झाली .या घटनेत सुमारे आठ लाख रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज दुकांन मालकाने व्यक्त केला आहे.

Body:राजू मोरे (रा.वाळूज महानगर) यांची आयोध्यानगर भागात समीक्षा किराणा या नावाने दुकान आहे.व दुकानाच्या मागेच ते वास्तव्यास आहे. आज पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास दुकानातून धूर घरात येत असल्याने मोरे झोपेतून जागे झाले. त्यांनी जाऊन पाहिले असता दुकानात आगीचे लोळ दिसत होते. दुकानात लागलेली आग पाहून घरातील महिलांनी आरडाओरड केला असता आजूबाजूच्या राहिवाश्यानी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आज आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाच्या क्रमांकावर संपर्क करून आगीची माहिती दिली. मात्र बराचवेळ होऊनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेच नाही.त्यामुळे काही नागरिकांनी अग्निशमन कार्यालय येथे जाऊन कर्मचारी यांना घेऊन आले मात्र तो पर्यंत आगीने संपूर्ण दुकानाला आगीच्या विळख्यात घेतले होते. जवानांनी आग आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.जर अग्निशमन दलाचे बंब वेळीच घटनास्थळी दाखल झाले असते तर अधिकचे नुकसान टळले असते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सणासुदीचे दिवस असल्याने मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच दुकानात मला भरले होते.दुकानातिल सुमारे 8 ते 9 लाखाचे साहित्य आगीत जाळून खाक झाले अशी माहिती मोरे यांनी दिली.या प्रकरणी एमयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. आगीची पाहणी करण्यासाठी दुपारी घटनास्थळी तहसीलदार यांचे पथक पंचनामा करण्यासाठी येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. त्यांनतर नेमका किती लाखाचा नुकसान झाले आहे ते समोर येईल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.