ETV Bharat / state

ऑटोमोबाईलच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

मनोज सुदाम सूर्यवंशी (रा.न्यू शांतिनिकेतन कॉलोनी, औरंगाबाद) यांचे पुंडलिकनगर परिसरातील हिंदुराष्ट्र चौक येथे मनोज ऑटोमोबाईल नावाने दुकान आहे. आज सकाळी या बंद दुकानाला अचानक आग लागली. आगीत लाखोंचे सामान जळून खाक झाले आहे.

आगीचे दृश्य
author img

By

Published : Nov 17, 2019, 12:12 PM IST

औरंगाबाद- ऑटोमोबाईलच्या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरातील हिंदू राष्ट्र चौकात घडली. शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आगीच्या विळख्यात सापडलेल्या दुकानाचे दृश्य

मनोज सुदाम सूर्यवंशी (न्यू शांतिनिकेतन कॉलोनी, औरंगाबाद) यांचे पुडलीक नगर परिसरातील हिंदुराष्ट्र चोक येथे मनोज ऑटोमोबाईल नावाने दुकान आहे. आज सकाळी या बंद दुकानाला अचानक आग लागली. सुरुवातीला किरकोळ आग असल्याने शेजारील दुकानदारांनी सूर्यवंशी यांना आगीची माहिती दिली व अग्निशमन दलालाही बोलावून घेतले. मात्र, सूर्यवंशी घरातून दुकानात पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण दुकानाला विळख्यात घेतले होते.

त्या दरम्यान औरंगाबाद अग्निशमन दलाच्या सिडको विभागातील दोन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी पुंडलिकनगर पोलिसांचे पथक देखील दाखल झाले होते. दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. नुकसानीचा आकडा १० ते १२ लाखाच्या घरात असण्याची शक्यता सूर्यवंशी यांनी वर्तविली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- 'डायमंड कप इंडिया-2019' बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक

Intro:

ऑटोमोबाईल च्या दुकानाला अचानक आग लागून दुकानातील सुमारे 10 ते 12 लाखाचा माल जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हिंदू राष्ट्र चौकात घडली.

Body:मनोज सुदाम सूर्यवंशी (रा.न्यु शांतीनिकेतन कॉलोनी, औरंगाबाद) यांची हिंदुराष्ट्र चौकात मनोज ऑटोमोबाईल नावाने दुकान आहे. आज सकाळी या बंद दुकानाला अचानक आग लागली सुरुवातीला किरकोळ आग असल्याने शेजारील दुकानदारांनी सूर्यवंशी यांना आगीची माहिती देत अग्निशमन दलालाही माहिती दिली.मात्र सूर्यवंशी घरातून दुकानात पोहोचे पर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण दुकानाला आगीच्या विळख्यात घेतले होते.औरंगाबाद अग्निशमन दलाच्या सिडको विभागाच्या दोन बंबाच्या साहाय्याने जवानांनि तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. यावेळी पुंडलीकनगर पोलिसांचे पथक देखील दाखल झाले होते. दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगी मध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे .नुकसानीचा आकडा 10 ते 12 लाखाचा घरात असण्याची शक्यता सूर्यवंशी यांनी वर्तवली आहे.दुपारपर्यंत पोलीस पंचनामा करीत होते.या प्रकरणी पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.