ETV Bharat / state

सिल्लोडमध्ये दुकानांना भीषण आग, आगीत सहा दुकाने जळाली - आगीत लाखोंचे नुकसान सिल्लोड

शहरातील भोकरदन रोडवरील सहा दुकानांना दुपारी साडेतीनच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून, मोठं नुकसान झालं आहे. या आगीत साजिद ऑटो पार्ट्स, गुजरात ट्रेडिंग कंपनी, महाराष्ट्र मशनरी, ईश्वर ऑटो पार्ट, आणि एक फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे.

सिल्लोडमध्ये दुकानांना भीषण आग
सिल्लोडमध्ये दुकानांना भीषण आग
author img

By

Published : May 4, 2021, 9:11 PM IST

सिल्लोड - शहरातील भोकरदन रोडवरील सहा दुकानांना दुपारी साडेतीनच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून, मोठं नुकसान झालं आहे. या आगीत साजिद ऑटो पार्ट्स, गुजरात ट्रेडिंग कंपनी, महाराष्ट्र मशनरी, ईश्वर ऑटो पार्ट, आणि एक फर्निचरचे दुकान जळून खाक झाले आहे.

सिल्लोडमध्ये दुकानांना भीषण आग, आगीत सहा दुकाने जळाली

आगीत लाखोंचे नुकसान

या आगीत विविध मशिनरी, विवध वाहनांचे पार्ट आणि लाकडी फर्निचर जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे ही दुकाने बंद होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर औरंगाबादच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली होती. मात्र अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत सिल्लोड नगपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आग अटोक्यात आणली. सदर घटनेची नोंद सिल्लोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा - मेक्सिको सिटी : मेट्रोचा पूल तुटल्यामुळे ट्रेन रस्त्यावर कोसळली; सुमारे १५ ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.