औरंगाबाद - वाळूज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने घरमालकाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रेमीयुगुलाला पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतले असून मुलाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती साहेबराव चूनवडे (रा.जोगेश्वरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मौत का कुवामध्ये मोटर सायकल चालवण्याचे काम करत होता. मारुती हा जोगेश्वरी परिसरात किरायाने राहतो. त्याने घरमालकाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. दरम्यान मुलगी मुलगा एकच वेळी घरातून पळून गेल्याने मुलीच्या घरच्यांना किरायादार असणाऱ्या मुलावर संशय व्यक्त केला होता. त्यांनतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि त्यानंतर लातूर येथून या जोडप्यास पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा -नागपुरातील कुख्यात गुंड शानुचा खून; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात