ETV Bharat / state

'कोरोना'च्या भीतीने मुलांनी मारली शाळेला दांडी; औरंगाबादेतील प्रकार

औरंगाबादचे परिचित असलेले डॉक्टर शोएब हाश्मी त्यांच्या भावांसह एकत्रित कुटुंबात कटकटगेट परिसरात राहतात. यांच्या कुटुंबातील सर्व मुलांनी एक दिवस चक्क शाळेला दांडी मारली. डॉक्टर शोएब यांना कळाल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना बोलावून शाळेत न जाण्याचे कारण विचारले. त्यावेळी कोरोना व्हायरस होण्याची भीती वाटत असल्याने आपण शाळेत गेलो नसल्याचे मुलांनी सांगितलं. त्यावेळी डॉ. शोएब हाश्मी यांनी कोरोना बाबत मुलांना इतके कुठून कळले असा प्रश्न पडला.

fear of corona virus in aurangabad student absent from school
'कोरोना'च्या भीतीने मुलांनी मारली शाळेला दांडी; औरंगाबादेतील प्रकार
author img

By

Published : Mar 6, 2020, 6:03 PM IST

Updated : Mar 6, 2020, 8:52 PM IST

औरंगाबाद - कोरोना व्हायरस मुळे देशात भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चांचा लहान मुलांवर परिणाम होताना दिसत आहे. औरंगाबादेत एका कुटुंबातील चिमुकल्यांनी कोरोनाच्या भीतीने शाळेला दांडी मारल्याचे समोर आले आहे.

'कोरोना'च्या भीतीने मुलांनी मारली शाळेला दांडी; औरंगाबादेतील प्रकार

औरंगाबादचे परिचित असलेले डॉक्टर शोएब हाश्मी त्यांच्या भावांसह एकत्रित कुटुंबात कटकटगेट परिसरात राहतात. यांच्या कुटुंबातील सर्व मुलांनी एक दिवस चक्क शाळेला दांडी मारली. डॉक्टर शोएब यांना कळाल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना बोलावून शाळेत न जाण्याचे कारण विचारले. त्यावेळी कोरोना व्हायरस होण्याची भीती वाटत असल्याने आपण शाळेत गेलो नसल्याचे मुलांनी सांगितलं. त्यावेळी डॉ. शोएब हाश्मी यांनी कोरोना बाबत मुलांना इतके कुठून कळले असा प्रश्न पडला.

यानंतर मुलांनी वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बाहेर पडल्यावर होणाऱ्या चर्चेतून त्यांना कोरोना बाबत माहिती मिळाल्याचे सांगितले.

मुलांनी सांगितले हे कारण -

कोरोना झाल्यास प्राण जाऊ शकतात. आपण आजारी पडू शकतो, असे कळल्याने भीती वाटली आणि आपण गेलो नाही असे मुलांनी सांगितले.

त्यानंतर डॉक्टर शोएब यांनी या सर्व मुलांची भीती दूर केली. तसेच काळजी घेतल्यास कोरोना होणार नाही, असा विश्वास दिला. यानंतर मुलांच्या मनातील भिती दूर झाल्यावर ते शाळेत गेले. तर मुलांनी आणि पालकांनी कोरोनाला घाबरू नये. योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. शोएब हाश्मी यांनी केले आहे.

Last Updated : Mar 6, 2020, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.