औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत राहणाऱ्या कंपनी कामगाराने त्याच्या 9 वर्षीय जुळ्या मुलांना विष पाजून स्वतः विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून दोन्ही चिमुकल्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बापाने आपल्याच मुलांना विष देत आत्महत्या का केली? याबाबत मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही.
जालना येथे उपचार : या प्रकरणी नातेवाईक आणि पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली आहे. हा कामगार सुमारे दहा वर्षापासून वाळूज औद्योगिक वसाहतीत रांजणगाव भागात रोजगार निमित्ताने राहत होता. तो त्याच्या दोन्ही मुलांना बाहेरून फिरून आणतो असे सांगून त्यांना घेऊन गेला. काही वेळा नंतर त्याने त्याच्या मावस भावाला फोन करून जालना - अंबड रस्त्यावर दोन्ही मुलांना विष पाहून स्वतः विष प्राशन केल्याची माहिती दिली. त्यानंकर त्याच्या मावस भावाने तातडीने घटनस्थळी दाखल होऊन त्याला व दोन्ही मुलांना जालना येथे रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार करून तिघांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पित्याचा मृत्यू : उपचार सुरू असताना पित्याचा मृत्यू झाला, तर दोन्ही मुलांवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तालय हद्दीतील सिडको पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे वाळूज सह रांजणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबियात काही वाद झाले होते का? की रोजगार बाबत काही समस्या उद्भवली होती का, या बाबत कुटुंबीयांना काही संकेत मिळाले होते का, या दृष्टीकोनाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलांना फिरायला नेतो असं त्याने सांगितलं होतं, म्हणजे हे पूर्व नियोजित कृत्य असल्याचा संशय पोलिसांना आहे. कामगार काम करत असलेल्या ठिकाणी आणि त्याच्या मित्रपरिवाराकडे याप्रकरणी विचारपूस करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.