छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : Farmers Fraud Solar Pump Name : दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेला संकट सतत येत असतात. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी विमा कंपन्यांची मदतीसाठी नकारघंटा हे नेहमीचच झाले आहे. आता बळीराजाला फसवणारी टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. वैजापूर तालुक्यात (Aurangabad Farmers Fraud News) सबसिडीमध्ये सोलर पंप (Solar Agriculture Pump) देण्याच्या नावावरून अनेकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच तालुक्यात जवळपास ८३ शेतकऱ्यांची खोट्या कृषी अधिकाऱ्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने चाळीस लाखांचा गंडा घातला आहे. तर याची व्याप्ती नाशिक जिल्ह्यात अधिक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोलर पंप सवलतीच्या दरात देण्याचा केला बनाव : शेती व्यवसाय अडचणीत आल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यात विजेची समस्या असल्याने शेतात पाणी देताना रात्री बे रात्री होणारा त्रास सोलर पंपामुळे कमी होईल म्हणून अनेकजण प्रयत्नात असतात. मात्र, त्यांच्या किंमती जास्ती असल्याने ते शक्य होत नाही. याचाच फायदा घेत सबसिडीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सौर पंप योजनेच्या नावाखाली प्रथमदर्शनी 83 शेतकऱ्यांना फसवल्याची माहिती (Agriculture Pump Scheme) समोर आली आहे.
दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल : वैजापूर तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांना तब्बल 39 लाख रुपयांचा गंडा या अधिकाऱ्याने घातला आहे. हा अधिकारी स्वतःला कृषी अधिकारी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. सचिन गजानन कांबळे असे या तोतया कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. तर गणेश सुधाकर औताडे असे न्यू इंडिया सोलर सिस्टमच्या ठेकेदाराचे नाव आहे. दोघेही महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या गाडीतून फिरत असल्याने, त्यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसला होता. या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सबसिडी दरात पंप देण्याचे आमिष : सौर पंप घेण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र कृषी विभागामार्फत कृषी सोलर पंप सबसिडी मिळत असून १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा 3 एच.पी पंप 35 हजार रुपये किंमतीला, २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा ५ एच.पी पंप 45 हजार रुपयांना व ३ लाख ५० हजार रुपयांच्या किंमतीचा ७.५ एच.पीचा पंप 55 हजार रुपयांना सबसिडी मध्ये मिळणार असे सांगण्यात आले. सोलार पंपासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागात नोकरीवर असलेले सचिन गजानन कांबळे यांच्याकडे पैसे भरल्यानंतर ते पोहेगाव येथील न्यू इंडिया सोलर सिस्टमचे कन्स्ट्रक्शन मालक गणेश सुधाकर औताडे यांच्यामार्फत शेतपंप शेतीवर बसून देत आहेत, असे सांगण्यात आले. त्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
४५ दिवसात पंप बसवण्याचे आमिष : सुरुवातीला दहा शेतकऱ्यांना सवलतीत सोलर पंप बसवून दिले. पैसे भरल्यावर ४५ दिवसांमध्ये सौर कृषी पंप मिळेल असे सांगण्यात आले. आपल्या गावातील शेतकऱ्यांना पंप मिळाल्याचे पाहून अनेकांनी पैसे भरले. मात्र दोन महिने झाले तरी पंप आले नाहीत. विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. मात्र लवकर मिळेल या अपेक्षेने लोकांनी धीर धरला. मात्र फसवणूक झाल्याचे कळताच शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. (Vaijapur Police Station). तर छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. अन्य ठिकाणी देखील पोलिसांना तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा -
- Fake Seeds : शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; 86 कंपन्यांपैकी 59 कंपन्यांची बियाणी बोगस - सत्तार
- Aurangabad Crime: मोत्यांची शेती करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक; आरोपी मोकाट
- Osmanabad Froud Case : शेतकऱ्यांची फसवणूक करणारा अखेर जेरबंद, बुलढाणा व परंडा पोलिसांची धाडसी कारवाई,