ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: 'तेल्या'मुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत - डोनवाडा डाळिंब उत्पादक शेतकरी

जिल्ह्यातील डोनवाडा गावातील बहुतांश शेतकरी डाळिंबाचे पीक घेतले आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे ऐन काढणीच्या वेळी डाळिंबावर तेल्या रोग पडल्याने हाता-तोंडाला आलेले पीक वाया गेले आहे. फुलंब्री तालुक्यातील 25 गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तेल्या रोगाचा फटका बसला आहे. पीक विमा कंपनी आणि कृषी विभाग शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

डाळिंबावरील तेल्या रोग
pomegranate Bacterial blight
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:33 PM IST

औरंगाबाद - सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना बळीराजा आता शेती मालावर पडणाऱ्या विविध रोगांमुळे त्रस्त झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी तेल्या रोगामुळे अडचणीत आला आहे. तेल्या रोग लागल्याने झाडाला आलेले डाळिंब काळे होऊन गळून पडत असल्याने त्यांचे बाजार मूल्य शून्य झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार दरबारी हात पसरण्याची वेळ आल्याची खंत औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

औरंगाबादच्या डोनवाडा गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी चर्चा केली...

'तेल्या' रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत

जिल्ह्यातील डोनवाडा गावातील बहुतांश शेतकरी डाळिंबाचे पीक घेतले आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे ऐन काढणीच्या वेळी डाळिंबावर तेल्या रोग पडल्याने हाता-तोंडाला आलेले पीक वाया गेले आहे. फुलंब्री तालुक्यातील 25 गावातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तेल्या रोगाचा फटका बसला आहे. पीक विमा कंपनी आणि कृषी विभाग शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

डोनवाडा येथील गोरख राऊत या शेतकऱ्याला मागील वर्षी डाळिंबाच्या माध्यमातून 10 लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते. यावर्षी तीन लाखांची गुंतवणूक करून एक हेक्टर शेतात डाळिंबाची बाग फुलवली. झाडाला मोठ्या प्रमाणात फळे आल्याने यावर्षीही चांगले उत्पन्न होईल, असे वाटत असताना डाळिंबावर तेल्या रोग पडला. डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. डाळिंब काळेपडून गळू लागली. सरकारने मदतीचा हात द्यायला हवा, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी गोरख राऊत यांनी केली.

डाळिंबाला चांगला भाव मिळण्यासाठी नाशिकच्या बाजार पेठेत विक्रीसाठी जावे लागते. जास्त उत्पादन झाले तर माल वाहतूक परवडते. कमी उत्पादन झाल्यावर सामूहिकरित्या मालवाहतूक करावी लागते. मात्र, यावर्षी आलेल्या तेल्याग्रस्त डाळिंबांना बाजारभाव मिळेल का? याबाबत शंका आहे. योग्य भाव मिळाला नाही तर डाळिंब फेकून द्यावी लागतील किंवा परत आणावी लागतील. त्यामुळे यावर्षी गुंतवणूक निघेल याची शास्वती नसल्याचे मत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरून मिळावे यासाठी शेतकरी पीकविमा काढतात. मात्र, पीकविमा कंपन्या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला येत नाहीत तर कृषी विभाग देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळे सरकारने तरी पाठीशी उभे राहावे, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकरी संघटनांनी याबाबत सरकारला निवेदन पाठवले आहे. लोक प्रतिनिधींनी सरकार दरबारी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब गायके यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.