औरंगाबाद - पिकावरील रोग आणि नापिकीला कंटाळून एका 42 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. औरंगाबाद जवळील असेगावात मध्यरात्री 12 च्या सुमारास समोर आली आहे. शाम दत्तू जाधव, असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा- पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर आरबीआयने व्यवस्थेत 'हा' केला बदल
मागील अनेक वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या एका नंतर एक आत्महत्येची संख्या ही चिंतेची बाब बनत आहे. याच दुर्दैवी घटनेची असेगावात पुनरावृत्ती झाली. जाधव यांना दोन एकर जमीन आहे. लागवडी, शेती मशागतीसाठी जाधव यांच्या वडिलांनी दोन लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, वर्ष उलटले तरीही कर्जाची परतफेड करु न शकल्याने शाम हे मागील अनेक दिवसांपासून तणावात होते. त्या बाबत ते नेहमी सांगायचे. मात्र, काल त्यांनी घरात कोणीही नसताना लोखंडी गजाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस देविदास गाडेकर अधिक तपास करत आहेत.