ETV Bharat / state

दुष्काळाचा सामना करणारा शेतकरी पुन्हा आशावादी, मात्र भांडवल नसल्याने विवंचनेत - marathwada droughts

औरंगाबाद जिल्ह्यात मान्सून पूर्व दोन मोठे पाऊस झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भांडवल नसल्याने शेती करावी कशी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

पेरणीच्या तयारीला लागलेले शेतकरी
author img

By

Published : Jun 11, 2019, 11:05 PM IST

औरंगाबाद - दुष्काळाचा सामना करणारा मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, नव्या जोमाने शेती करायला अनंत अडचणी असल्याने शेती व्यवसाय करावा कसा, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. आधीचेच कर्ज चुकते केले नसल्याने बँक नव्याने कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विवंचनेत वाढ झाली आहे.

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाने यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची घेतलेला आढावा

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी औरंगाबाद 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने पळशी गावातील कचरू पळसकर या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आढावा घेतला. शेतकऱयांपुढे अडचणींचा डोंगर उभे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खते, बी-बियाणे आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशाही परिस्थितीत शेतकरी शेतात राबत आहेत.

कचरू पळसकर यांना दोन एकर शेती आहे. मागील दोन वर्षांच्या दुष्काळामुळे त्यांची शेती तोट्यात आहे. घरात पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत काही पिकत नसल्याने दोन वर्षांपासून कचरू दुष्काळाच्या झळा भोगत आहेत. दोन वर्षात शेतीत काहीही न उगल्याने बँकेचे एक लाखांचे कर्ज थकीत आहे. आता पाऊस चांगला होईल, असा विश्वास त्यांना आहे. मात्र, नव्या जोमाने शेती करायला आता पैशांची गरज असताना थकबाकीदारांमध्ये नाव आल्याने बँक कर्ज देणार नसल्याने यावर्षी पेरणी कशी करावी, असा प्रश्न कचरू पळसकर यांना पडला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मान्सून पूर्व दोन मोठे पाऊस झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, भांडवल नसल्याने शेती करावी कशी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यातच मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि आरोग्य याचा खर्च कर्ज काढुन भागवण्याची वेळ आली आहे.

Intro:दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा पेरणी करण्यासाठी एकदा सज्ज झालाय. मात्र नव्या जोमाने शेती करायला अडचणी अनंत असल्याने शेती व्यवसाय करावा कसा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी औरंगाबादच्या प्रतिनिधीने पळशी गावातील कचरू पळसकर यांच्या शेतात जाऊन घेतलेला आढावा पाहुयात.

Body:पळशी गावातील दोन एकर शेतजमीन असलेल्या कचरू पळसकर यांना पुन्हा शेती फुलवायची आहे. निसर्ग साथ देईल असा विश्वास असला तरी बँक साथ देणार नसल्याने शेती व्यवसाय करू कसा असा प्रश्न त्यांना पडलाय. इतकंच नाही जर शेती जगवता आली नाही तर आत्महत्या करावी लागेल अशी भावना त्यांच्या कचरू यांची पत्नी लक्ष्मीला पडलाय.

Conclusion:vo1 - औरंगाबाद जिल्ह्यात मान्सून पूर्व दोन मोठे पाऊस झाले. पाऊस जरी मान्सून पूर्व असला तरी या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे शेतकरी कसा पुन्हा एकदा शेतीच्या कामाकडे वळला याबाबत आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे पळशी गावातील कचरू पळसकर यांच्याकडे गेले. कचरू पळसकर यांचं संपूर्ण कुटुंब पेरणीच्या तयारीला लागलं होतं. कचरू पळसकर यांची अवघी दोन एकर शेती. मागील दोनवर्षाच्या दुष्काळाने शेती व्यवसाय कोलमडला. घरात पत्नी आणि दोन मुलं अस कुटुंब. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत काही पिकत नसल्याने दोन वर्षांपासून कचरू यांची चिंता वाढली आहे. दोन वर्षात शेतीत काही न उगल्याने बँकेचं एक लाखांचं कर्ज थकीत राहील. आज पाऊस चांगला होईल असा विश्वास त्यांना आहे. मात्र नव्या जोमाने शेती करायला आता पैश्यांची गरज असताना थकबाकी दारांमध्ये नाव आल्याने आता बँक कर्ज देणार नसल्याने यावर्षी पेरणी करावी कशी असा प्रश्न कचरू पळसकर यांना पडलाय.

byte - कचरू पळसकर - दुष्काळग्रस्त शेतकरी

vo2 - कचरू यांचा मोठ्या हिमतीने साथ देणारी त्यांच्या पत्नी लक्ष्मी देखील पावसाच्या आशेने जोमाने कामाला लागल्या आहेत. निसर्गाने साथ दिली तर शेतीपुन्हा फुलेल असा विश्वास आहे. मात्र मागील दोन वर्षांच्या दुष्काळाने ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्या काहीश्या खचल्या आहेत. आता जर नुकसान झालं तर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचं लक्ष्मी पळसकर यांनी सांगितलं.

byte - लक्ष्मी पळसकर - कचरू यांच्या पत्नी

vo3 - दुष्काळी परिस्थितीमुळे कचरू पळसकर यांची दोनही मुलं चिंतीत असतात. मोठा मुलगा कंपनीत काम करून कुटुंबियांच्या गरजा भागावण्याचा प्रयत्न करतोय. तर लहानमूलगा शिक्षण घेतोय मात्र शिक्षण घेताना शेती करण्याची इच्छा असूनही दुष्काळाच्या भीतीने नौकरी करण्याचा विचार तो करतोय.

byte - कारभारी पळसकर - कचरू यांचा मोठा मुलगा
byte - केशव पळसकर - कचरू यांचा लहान मुलगा

vo4 - दुष्काळाशी दोनहात करण्याची तयारी पळसकर कुटुंबाची आहे. निसर्गाची साथ मिळेल का नाही हे कोणाच्या हातात नाही, मात्र सरकारी यंत्रणा शासनाच्या विविध योजना या तरी या शेतकऱ्यांना जगण्यास बळ देतील का हा खरा प्रश्न आहे.

END PTC
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.