औरंगाबाद: सुरेखा संतोष दळवी आणि संतोष किसन दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. पत्नीने सोमवारी आत्महत्या केली. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यावर पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. तीन एकर शेती मात्र सततची नापिकता, विविध बॅंकेचे कर्ज अशा आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मयत पती- पत्नी पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. एका मुलीचे लग्न झालेले आहे. या कुटुंबाला आधाराची गरज असून यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने हातभार लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी एक आत्महत्या: औरंगाबादच्या पाचोड परिसरातील वडजी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात होणारी सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्याचा पर्याय निवडला. हा शेतकरी सततच्या नापिकीमुळे आलेल्या नैराश्यामुळे कंटाळला होता. त्यामुळे त्याने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना सोमवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव अक्षय दिलीप गोजरे असे आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढत आहे. सरकारतर्फे शेतकरी मदतीसाठी अनेक घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याने पुन्हा एकदा दिसून आले आहे.
सोयाबीन हातचे गेल्याने आत्महत्या: परतीच्या पावसाने तळहाताच्या फोडासारखी जपलेली सोयाबीन उद्धवस्त झाली. यामुळे उद्धवस्त झालेली सोयाबीन पाहून, अल्पभूधारक शेतकऱ्याने, आत्महत्या केली. ही धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना, बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव येथे 16 ऑक्टोबर, 2022 रोजी घडली.
तीन मुली, एक मुलगा: संतोष अशोक दौंड (वय 40 रा. राजेगाव ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संतोष यांना तीन मुली आणि एक मुलगा असून त्यातील एक मुलगी लग्नाला आलेली आहे. या वर्षीच्या पिकाचे पैसे आल्यावर मुलीचे लग्न करता येईल, अशी इच्छा त्यांनी घरी बोलून दाखवलेली होती. मात्र परतीच्या पावसाने डोळ्यादेखत काढलेले सोयाबीन वाहून गेले तर काही भिजले. तर ठिकाणी कापूस होता त्याच्या देखील पावसाने वाती झाल्या.
नैराश्येतून गळफास: यामुळे आता मुलीचे लग्न कसे करायचे ? सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे? या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान सकाळी सोयाबीन वेचायला गेलेला संतोष अजून कसे परतले नाही ? हे पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेहच दिसल्याने त्यांनी एकच टाहो फोडला.
हेही वाचा: Thane Crime: वडिलांच्या कटकटीला वैतागून, मुलानेच केली हत्या