औरंगाबाद - लाडसावंगीजवळील आलमपूर शिवारातील कपाशीवर कीटकनाशक फवारणी केल्याने तीन एकरवरील सरकी वाळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी सहायक गावात येत नसल्यामुळे कृषी दुकानदार जे औषध फवारणी करण्याचा सल्ला देतात तेच शेतकरी शेतात फवारतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी दुकानदार जास्त नफा देणारी औषधे फवारणी करण्याचा सल्ला देऊन शेतकऱ्याची लुटमार करतात.
हेही वाचा - बैल पोळ्याच्या आदल्या दिवशीच विजेचा झटका लागून दोन बैलांचा मृत्यू, शेतकरी गंभीर जखमी
भोगलवाडी क्रमांक २ येथील मदनसिंग फुलसिंग मंडावत या शेतकऱ्याने आलमपूर शिवारात (गट क्रमांक १०/१ ) पाच एकर कपाशी लागवड केली. यात तीन एकरावर १० ऑगस्टला कीटकनाशक व टॉनिक मिसळून फवारले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शेतात गेले असता कपाशीचे पिक करपून गेल्याने कृषी दुकानदाराला हा प्रकार दाखवला. त्याने सुचवलेल्या फवारण्या दोन वेळा केल्या परंतु कपाशीचे पिक सुधारण्याऐवजी वाळून गेल्याने तब्बल तीन एकरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - लातूरमध्ये शेती व्यवसाय धोक्यात; जगावे की मरावे शेतकऱ्यांसमोर प्रश्न
कपाशीवरील औषध फवारणी केल्यानंतर हा प्रकार दुकानदाराला दाखवला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. १७ ऑगस्टला तेच औषध दुकानदारासमोर दुसऱ्या शेतातील कपाशीवर फवारले असता तेही वाळत असल्याचे शेतकऱ्याने दुकानदाराला दाखवले. त्यानंतर दुकानदाराने आरेरावी केल्याचे शेतकऱयाने सांगितले. २० ऑगस्टला औषध दुकानदाराने कंपनीच्या अधिकाऱ्याना वाळलेली कपाशी दाखवायला आणले, मात्र शेतातल्या जमिनीत घटक कमी आहेत म्हणून असे झाले, असा किरकोळ पंचनामा करून अधिकारी निघून गेले. आधीच दुष्काळजन्य परस्थिती त्यात औषध फवारणीने तीन एकर जमिनीवरील कपाशी वाळून गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. वरिष्ठांनी दखर घेऊन संबंधीत औषध दुकानदारावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मदनसिंग मडावत यांनी केली आहे.