ETV Bharat / state

Extortion Demand by Blackmailing: छत्रपती संभाजीनगरमध्ये केली जात आहे उद्योजकांकडून खंडणीची मागणी; उद्योग टिकवण्याचे आव्हान

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. काही राजकीय नेते संघटना उद्योजकांकडून खंडणी घेत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे मसिआ संघटनेने केली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणे झाला आहे. त्याबाबत तोडगा काढू, असा आश्वासन मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र अशा परिस्थितीत व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत असतील तर नवीन उद्योग कसे येतील? असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

Extortion Demand by Blackmailing
खंडणीची मागणी
author img

By

Published : May 11, 2023, 8:34 AM IST

पुढच्या पाच वर्षात उद्योगांची परिस्थिती बिकट होईल- उद्योजक संघटना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. 1980 नंतर आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढणार शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादची ओळख निर्माण झाली होती. मात्र कालांतराने ही गती हळूहळू मंदावत गेली. तरी अनेक उद्योगांनी शहरात आपले प्रस्थ जमवत रोजगार निर्मितीत मोठा वाटा उचलला. मात्र आज हेच उद्योग अडचणीत सापडले आहेत. उद्योजकांकडून ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळली जात असल्याचा धक्कादायक आरोप मसिआ संघटनेचे अध्यक्ष किरण जगताप यांनी एका बैठकीत केला.

50 हजार ते 5 लाखांपर्यंत खंडणीची रक्कम मागितली जात आहे- मसिआ अध्यक्ष किरण जगताप

खंडणी मागत असल्याचा धक्कादाय आरोप : दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी घेतलेल्या बैठकीत उद्योजकांच्या समस्यांबाबत सांगताना, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मसिआतर्फे येत असलेल्या अडचणी सांगण्यात आल्या. त्यात माहिती अधिकार वापरून, त्या माध्यमातून काही संघटनांचे पदाधिकारी विनाकारण धमकवण्याच्या आणि त्या माध्यमातून खंडणी मागत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. त्यामुळे आता या शहरात उद्योग उभारणी करावी का नाही असा प्रश्न, नवीन उद्योजकांना पडल्याचे मसिआ अध्यक्ष किरण जगताप यांनी सांगितले.

सरकार गांभीर्याने घेईना : काही दिवसांपूर्वी शहरात मसिया संघटनेतर्फे एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव दोघेही आले नाहीत, मात्र समारोप प्रसंगी देवेंद्र फडणवीस हे आले असताना उद्योजकांनी ही बाब त्यांच्या कानावर टाकली होती. त्यावर आपण यावर लवकरच बैठक घेऊ आणि तोडगा काढू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप वेळ मिळाली नाही. लवकरच त्यांच्याशी भेट घेणार आहोत, अशी माहिती मसिआ संघटनेचे पदाधिकारी सुरेश खिल्लारे यांनी दिली.

नवीन उद्योगांना सुविधा नाही : इतर राज्यांमध्ये उद्योग पळवले जातात, अशी ओरड राजकीय पक्ष करतात. मात्र महाराष्ट्रात नवीन उद्योग येत असताना त्यांना सोयी सुविधा मिळतात का? हा देखील मोठा प्रश्न आहे. इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात विजेचे दर उद्योगांसाठी खूप जास्त आहेत. त्यामुळे उत्पादकता किंमत वाढते, अशात नवीन उद्योग याबाबत विचार करतात. त्याचबरोबर पायाभूत सुविधा कशा आहेत? हे देखील पाहिले जाते. साधे विजेचे कनेक्शन घ्यायचे असेल, तर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागतो. तर पाण्याची उपलब्धता आहे का? हे देखील पाहिले जाते. या सगळ्या गोष्टी असल्या तरी तिथली सामाजिक स्वास्थ आणि राजकीय परिस्थिती काय आहे? याचा देखील विचार केला जातो. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला, तर महाराष्ट्र सुविधा देण्यात खूप मागे पडला. त्यामुळे नवीन उद्योग येऊ इच्छित नाहीत. जर लवकरच आपण आपल्या चुका सुधारल्या नाहीत तर, मात्र पुढच्या पाच वर्षात उद्योगांची परिस्थिती बिकट होईल, अशी भीती उद्योजक संघटनांनी व्यक्त केली

चोऱ्या वाढल्या : एकीकडे उद्योजकांकडून खंडणी मागण्यात येत असल्याच्या घटना वाढत आहेत. दुसरीकडे रोजंदारीवर असणाऱ्या किंवा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चोरांची भीती वाढली आहे. पाच तारखेपासून 15 तारखेपर्यंत या काळात कामगारांच्या पगारी केल्या जातात. मात्र त्याचवेळी रस्त्यावरून जात असताना रस्त्यात अडवून चोर त्यांना लूटत आहेत. त्यांचे मोबाईल चोरून नेत आहेत, त्यामुळे कामगार देखील सुरक्षित राहिलेला नाही. याबाबत अनेक वेळा तक्रारी नोंदवली आहे, घटना छोटी असली तरी त्याचे परिणाम दूरगामी आहेत. त्यामुळे अनेक नवीन उद्योजक येताना ह्या गोष्टींचा देखील विचार करतात, असे मत संघटनेचे पदाधिकारी मनीष अग्रवाल यांनी व्यक्त केले.

  1. हेही वाचा : Beed Crime: खळबळजनक! 3 लाखांच्या खंडणीसाठी कॉन्ट्रॅक्टरच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण
  2. हेही वाचा : Pune Crime: मोहोळ यांच्या नावाने मागितली तब्बल 3 कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा
  3. हेही वाचा : Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीस खंडणी प्रकरण; अटकेविरोधात अनिक्षा, अनिल जयसिंघानींची न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.