औरंगाबाद - शहरालगत असलेल्या सातारा देवळाई परिसरासाठी 2015मध्ये नगरपालिका अस्तित्वात येणार होती. मात्र ऐनवेळी सातारा देवळाई महानगर पालिकेत समाविष्ट करण्यात आले. या परिसराला पुन्हा नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी नागरिकांनी वाघ्या मुरळी आणून महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
गेल्या साडेतीन वर्षांपासून सातारा देवळाई ओरंगाबाद महापालिकेचा भाग आहे. मात्र, या काळात परिसराचा कुठलाही विकास महापालिकेने केला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी वाघ्या-मुरळीचा गोंधळ घालून जागे करण्याचा प्रयत्न केल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, महापालिकेत सेना-भाजप आमने सामने
महापालिकेत समावेश झाल्यापासून विकास रखडला आहे. रस्ते, पाणी, अस्वच्छता अशा समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून पालिका त्याकडे लक्ष देत नसल्याने महापालिकेऐवजी आम्हाला नगर पालिकेत समाविष्ट करा, अशी मागणी आता सातारा देवळाई परिसरातील नागरिक करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.